daughter drive corona patient in car 
नाशिक

कोरोनाग्रस्त मातेने घरातच सोडला प्राण; एकटी लेक कारने घेऊन गेली स्मशानात

कोरोनाग्रस्त रुग्णाला कारमध्ये सलाइन लावण्याची वेळ आल्यानंतरची नाशिकमधील धक्कादायक घटना

ज्योती देवरे

म्हसरूळ (जि.नाशिक) : बेड मिळत नसल्याने कोरोनाग्रस्त रुग्णाला कारमध्ये सलाइन लावण्याची वेळ आल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये आणखी एक घटना धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे जगण्याने छळले होते. मरणाने केली सुटका...असेही म्हणता येणार नसल्याचे वास्तव समोर आले आहे. काय घडले नेमके?

एकटी लेक कारने घेऊन गेली स्मशानात

पंचवटीतील अमृतधाम परिसरातील उषा डिगंबर इंगळे (वय ७०) असे या मृत महिलेचे नाव आहे. त्या कोरोना पॉझिटिव्ह होत्या. त्यांना ऑक्सिजन बेड मिळावा यासाठी त्यांच्या कन्या गायत्री यांनी चार पाच दिवसांपासून बरेच प्रयत्न करत होत्या. अनेकांना फोन करून ऑक्सिजन बेड मिळवून देण्याची विनवणी त्या करत होत्या. अखेर रविवारी मध्यरात्री या मातेने राहत्या घरातच अखेरचा श्वास घेतला. मात्र मृत्यूनंतरही त्या लेकीला आपल्या मातेच्या अंत्यसंस्कारासाठी झगडावे लागले. चार तास प्रतीक्षा करूनही शववाहिका मिळाली नाही. अखेर या लेकीनेच आपली कार काढली आणि कारमध्येच मातेचा मृतदेह टाकून थेट स्मशानभूमीचा रस्ता धरला. अंत्यसंस्कारासाठी मृत्यूदाखला लागत असल्याने जातानाच आधी मेरी कोविड सेंटर गाठले. तिथून मृत्यूदाखला घेतला आणि पुढे पंचवटी अमरधाममध्ये त्या मातेवर अंत्यसंस्कार पार पडले. या धक्कादायक प्रकारामुळे महापालिका प्रशासनाच्या बोजवारा उडाल्याचे समोर आले आहे

महापालिका प्रशासनाचे धिंडवडे

तब्बल चार तास प्रतीक्षा करूनही अंत्यसंस्कारासाठी शववाहिकाही न मिळाल्याने एकट्या लेकीलाच कारमधून मृतदेह स्मशानात न्यावा लागल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या प्रकारामुळे महापालिका प्रशासनाचे धिंडवडे निघाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

SCROLL FOR NEXT