नाशिक

४५० कोटींच्या डावा तट कालवा प्रकल्पावरून वाद

CD
टूडे साठी महत्वाचे --------------------- साडेचारशे कोटीच्या डावा तट कालवा प्रकल्पावरून वाद टनेलच्या अटीमुळे निविदा संशयाच्या भोवऱ्यात, आमदार ढिकले यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ९ : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरात सुरू असलेल्या मोठ्या विकासकामांमध्ये आता डावा तट कालवा बंदिस्त करण्याचा सुमारे ४५० कोटी रुपयांचा प्रकल्प वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. या कामाच्या निविदेत टनेल बांधकामाचा अनुभव असण्याची अट घालण्यात आल्याने ही निविदा ठराविक ठेकेदारासाठीच तयार करण्यात आल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार करत अटींची चौकशी करण्याची मागणी केली आहे. पाटबंधारे विभागाने या प्रकल्पाचा प्रस्ताव सादर केला होता. डावा तट कालवा बंदिस्त करून त्यावर रस्ता तयार केल्यास पूर्व- पश्चिम रिंगरोडला जोडणी मिळेल आणि शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विभागाचा दावा आहे. त्याचबरोबर नाशिक आणि निफाड परिसरातील दहा गावांना वळणाचे पाणी उपलब्ध होणार असल्याचेही प्रस्तावात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने प्रकल्पाला मंजुरी दिली. मात्र मंजुरीनंतर निविदा प्रक्रिया सुरू होताच अटी आणि शर्तींवरून वाद सुरू झाला. निविदेत सहभागी होण्यासाठी टनेल बांधकामाचा अनुभव बंधनकारक करण्यात आला आहे. या अटीमुळे राज्यातील बहुतांश स्थानिक आणि अनुभवी कंत्राटदार या स्पर्धेतून आपोआप बाहेर फेकले जात असल्याचे स्थानिक कंत्राटदारांचे म्हणणे आहे. केवळ मोजक्या मोठ्या कंपन्यांकडेच अशा प्रकारचा अनुभव असल्याने स्पर्धा मर्यादित होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्थानिक कंत्राटदारांनी ही बाब आमदार ढिकले यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी या अटींवर आक्षेप घेण्यात आला आहे. -------------------------चौकट सर्वांना समान संधीचा अधिकार सार्वजनिक निधीतून ४५० कोटींचे काम होणार असल्याने निविदा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असायला हवी आणि सर्व पात्र कंपन्यांना समान संधी मिळायला हवी, अशी भूमिका त्यांनी पत्रात मांडली आहे. टनेल बांधकामाच्या अनुभवाची अट नेमक्या कोणत्या तांत्रिक निकषांच्या आधारे घातली, याची तपासणी व्हावी, अशी मागणीही ढिकले यांनी केली आहे. अशी अट घालून स्पर्धा मर्यादित होत असेल तर ती अन्यायकारक आहे. त्यामुळे निविदेतील अटींचा फेरविचार करून योग्य ती कार्यवाही करावी, असे पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, या अटींविरोधात काही ठेकेदारांनी न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया न्यायालयीन वादात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प वेळेत पूर्ण करणे गरजेचे असताना वादामुळे कामाला विलंब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. -----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Politics : "गोकुळचं दार मी उघडलं म्हणून..."; महायुतीच्या दोन बड्या मंत्र्यांवर सतेज पाटलांचा थेट प्रहार!

AI Hallucination: धक्कादायक! सरकारी आदेशातच चक्क सुप्रीम कोर्टाचे बनावट निकाल? मुंबई उच्च न्यायालयाने काय केले पाहा...

Diwali Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँकांना सुट्ट्यांची मेजवानी! महाराष्ट्रासह 'या' ३ राज्यांत राहणार बंद; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Rocket Firecrackers Ban: दिवाळीच्या उत्साहावर नियमांचं बंधन! मुंबईत रॉकेट फटाक्यांवर बंदी; महापालिकेचा मोठा निर्णय

Maharashtra Live News: "उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनील तटकरेंनीच दादांचा घात केला"; रामदास कदमांच्या विधानामुळे महायुतीत खळबळ

SCROLL FOR NEXT