नाशिक

दिवसा उन्हाचा चटका व ढगाळ वातावरणाचा अनुभव

CD
दिवसा उन्हाचा चटका; ढगाळ वातावरणाचा अनुभव (उपशीर्षक) रात्री गारवा; बदलत्या हवामानाचा अनुभव सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १ : जिल्ह्यात सध्या हवामानात सातत्याने बदल होत असून, दिवसा उन्हाचा चटका जाणवत असतानाच आकाशात ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. तर रात्री दहानंतर तापमानात काहीशी घट होत असल्याने रात्रीच्या वेळी गारवा जाणवू लागला आहे. दिवसा उष्णता आणि रात्री तुलनेने थंडावा अशा संमिश्र वातावरणाचा अनुभव नागरिक येत आहे. अर्णब वादळामुळे काही भागात जोरदार पाऊस झाला. तर जिल्‍ह्यात गेल्या काही दिवसांपासून सकाळी ढगाळ वातावरण निर्माण होऊन दुपारी मात्र उन्हाची तीव्रता जाणवत आहे. शिवाय दिवसा अधूनमधून आकाशात ढग जमा होत असल्याने उन्हाची तीव्रता काहीशी कमी होते. ढगाळ वातावरणामुळे दिवसभर हवेत बदल जाणवत आहेत. तर आता पुढील तीन– चार दिवस कमाल व किमान तापमानात घट होण्याची शक्‍यता असल्‍याने दिवसा उन्हाचा चटका कमी होऊन रात्री आणि पहाटे थंडीचा गारवा वाढण्याची शक्‍यता आहे. तर जिल्‍ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता वर्तविली आहे. चौकट हवामानात चढ-उतार दिवसा ऊन, अधूनमधून ढगाळ वातावरण आणि रात्री गारवा अशा बदलत्या स्थितीमुळे नागरिकांना हवामानातील चढ-उतार अनुभवायला मिळत आहेत. सकाळी आणि रात्री बाहेर पडताना काहीसा थंडावा जाणवत आहे. वातावरणातील या बदलाचा परिणाम शरिरावर होत असून यामुळे आजार देखील पसरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा रक्तरंजित संघर्ष! दोन गटांत भीषण गोळीबार; पाच जणांचा मृत्यू, तणाव वाढणार?

IND vs NZ: ईशान किशनने सूर्यकुमारला टाकलं मागे अन् असा पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय

Drought Crisis: टंचाईच्या स्थितीतून बळीराजाला सावरण्याचा प्रयत्न ;शरद पवार यांचा दौरा सुरु

Latest Marathi News Update : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माढा तालुक्यात केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी, शेतकऱ्यांशी साधला संवाद

IND vs NZ ODI: टी-२० मालिकेनंतर टीम इंडिया पुन्हा सज्ज! पहिला वनडे सामना कधी, कुठे अन् किती वाजता? लाईव्ह सामना टीव्ही मोबाईलवर कुठे पाहता येणार?

SCROLL FOR NEXT