dead body esakal
नाशिक

Nashik News : 50 वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळला

सिन्नर तालुक्यातील पांगरी शिवारात जाम नदीपात्रालगत खडकाच्या आडोशाला एका अनोळखी पन्नास वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सिन्नर तालुक्यातील पांगरी शिवारात जाम नदीपात्रालगत खडकाच्या आडोशाला एका अनोळखी पन्नास वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे.

पांगरी बुद्रुक चे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष चंद्रभान दळवी यांनी वावी पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली. सदर व्यक्ती वाटसरू असल्याचे सांगण्यात येते. (dead body of 50 year old man was found in sinnar nashik news)

बेशुद्ध अवस्थेत असलेल्या या व्यक्तीला पोलिसांनी रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता त्याचा रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

उपाशीपोटी असल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. अर्ध नग्न अवस्थेत असलेल्या मृताच्या जवळ सफेद रंगाचा जांभळ्या रेषा असलेला मळकटलेला शर्ट, चॉकलेटी रंगाची फुल पॅन्ट, एक काळ्या रंगाचा चामडी कंबरेचा पट्टा अशा वस्तु आढळून आल्या.

बांधा सडपातळ, उंची 4.5 ते 4.75 फुट, डोक्याचे व दाढीचे केस काळे पांढरे वाढलेले, अगांत चॉकलेटी रंगाची अंडर वेअर, महेंदी रंगाची हाफ पॅन्ट असे वर्णन असलेल्या सदर व्यक्तीबाबत माहिती असल्यास वावी पोलिस ठाणे अथवा जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलिसनिरीक्षक संदेश पवार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT