Degree admission latest marathi news esakal
नाशिक

Degree अर्जासाठी गुरुवारपर्यंत मुदतवाढ; तंत्रशिक्षण संचालनालयाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान (Engineering and Technology) शाखेतून पदविका (Degree) शिक्षणक्रमाच्‍या प्रवेशासाठीची प्रक्रिया सध्या सुरु आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्‍या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी गुरुवार (ता.२१) पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाने (Directorate of Technical Education) यासंदर्भात सूचनापत्र जारी केले आहे. वाढीव मुदतीत विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणी करून घ्यायची आहे. (Deadline for Degree application extended till Thursday Nashik latest marathi news)

शासकीय व खासगी तंत्रनिकेतनमध्ये प्रवेशाची लगबग सध्या बघायला मिळते आहे. सध्या अकरावी प्रवेशाची प्रक्रिया रखडलेली असताना, दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदविका शिक्षणक्रमात प्रवेशाची संधी उपलब्‍ध करून देण्यासाठी अर्ज करण्याची मुदत तंत्रशिक्षण संचालनालयाने वाढविली आहे.

या वाढीव मुदतीनुसार गुरुवार (ता.२१) पर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. या वाढीव मुदतीतच विद्यार्थ्यांना इ- स्‍क्रुटीनी किंवा प्रत्‍यक्ष स्‍क्रुटीनी या पर्यायांपैकी एकाची निवड करून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे.

आता २६ ला अंतिम यादी

अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ दिल्‍याने पुढील वेळापत्रकात बदल झालेले आहेत. त्‍यानुसार २३ जुलैला प्रारूप गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचे नियोजित आहे. यासंदर्भात तक्रारी, हरकती नोंदविण्यासाठी २५ जुलैपर्यंत मुदत दिली जाईल. अंतिम गुणवत्ता यादी २६ जुलैला प्रसिद्ध करण्याचे नियोजित आहे.

"विद्यार्थ्यांच्‍या हिताच्‍या दृष्टीने पदविका अभ्यासक्रमांच्‍या नोंदणीसाठी मुदतवाढीचा निर्णय विभागाने घेतला आहे. या वाढीव मुदतीत प्रक्रिया पूर्ण करत विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज करावेत. प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेता येईल."

- ज्ञानदेव नाठे, सहसंचालक, तंत्रशिक्षण संचालनालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Care : कोण म्हंटल माधुरी हत्तीचा विषय शांत झालाय, वनताराची टीम पुन्हा नांदणीत; आजच्या बैठकीत काय घडलं?

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rain-Maharashtra Latest Live News Update: ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापुर धरण पाणी पातळी वाढ

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT