Admissions
Admissions esakal
नाशिक

Nashik : थेट द्वितीय वर्ष पदविकेच्या प्रवेश अर्जाची 8 जुलैपर्यंत मुदत

अरूण मलाणी

नाशिक : उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत पदविका (Departments of Higher and Technical Education) अभ्यासक्रमांच्‍या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक (Timetable) जाहीर केले आहे. त्‍यानुसार शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीसाठी ८ जुलैपर्यंत मुदत असणार आहे. (Deadline for direct second year diploma admission application till July 8 nashik news)

राज्‍यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचलित व खासगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्‍थांच्‍या प्रवेशप्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. तसेच कागदपत्रांच्‍या स्‍कॅन छायाप्रती अपलोड करायच्‍या आहेत. कागदपत्रे पडताळणी करत अर्ज निश्‍चित करण्याची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. भौतिकशास्‍त्र, गणित, रसायनशास्‍त्र, कॉम्‍प्‍युटर सायन्‍स, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, इन्‍फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी, जीवशास्‍त्र, इन्फर्मेटिक्स प्रॅक्‍टिसेस, बायोटेक्‍नॉलॉजी, टेक्‍निकल व्‍होकेशनल, ॲग्रिकल्‍चर, अभियांत्रिकी ग्राफिक्‍स, बिझनेस स्‍टडीज यापैकी कुठल्‍याही तीन विषयांसह बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण झालेले असावे. याशिवाय दहावीनंतर दोन वर्षे कालावधीचा आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्‍यक आहे. अन्‍य अटींचीही पूर्तता करावी लागणार आहे.

प्रवेशाच्‍या या प्रक्रियेअंतर्गत ऑनलाइन नोंदणीसाठी ८ जुलैपर्यंत मुदत असेल. कागदपत्रांची ई-स्‍क्रुटीनी किंवा प्रत्‍यक्ष कागदपत्रे पडताळणी प्रक्रियादेखील ८ जुलैपर्यंत करायची आहे. तात्‍पुरती गुणवत्ता यादी ११ जुलैला प्रसिद्ध केली जाईल. यादीसंदर्भात हरकती नोंदविण्यासाठी १२ ते १४ जुलैदरम्‍यान मुदत असेल. १५ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार असल्‍याचे तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे जाहीर केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

Latest Marathi News Live Update : उद्या जर बिभव स्वतः आले नाहीत तर...स्वाती मालीवाल प्रकरणात महिला आयोग आक्रमक!

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

Dry Day: मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?

नळातून किंवा शॉवरमधून पाणी येत नसेल तर घरच्या घरी 'असे' करा दुरुस्त

SCROLL FOR NEXT