Admission Sakal
नाशिक

English School Admission : इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी 30 जून पर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा

: आदिवासी विकास विभागांतर्गत नाशिक प्रकल्प क्षेत्रातील पेठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, येवला, निफाड, इगतपुरी, सिन्नर या तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी पहिली मध्ये प्रकल्प कार्यालयात प्रवेशासाठी ३० जून २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी जितीन रहमान यांनी केले आहे. (Deadline for English school admission 30th June nashik news)

पहिलीत प्रवेशासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या जुना आग्रा रोड वरील आदिवासी विकास भवनात नाशिक येथे पाल्याचा जन्म दाखला व पालकाचा सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला २४ जून २०२३ पर्यंत सादर केल्यानंतर प्रवेशला अर्ज विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल. प्रवेशाचा अर्ज परिपूर्ण भरून ३० जून २०२३ पर्यंत प्रकल्प कार्यालय, नाशिक येथे सादर करावा लागणार आहे. आधार कार्ड असलेल्या विद्यार्थ्यांचा अर्ज भरून दिल्यानंतर पात्र ठरलेल्या अर्जातील कागदपत्रे पडताळणीसाठी संबंधित पालक व पाल्यांना कधी व कुठे उपस्थित रहायचे याबाबत नाशिक प्रकल्प कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर सूचना देण्यात येतील. त्याचप्रमाणे मंजूर लक्षांकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास लकी ड्रॉ पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. संबंधित जिल्ह्यांचे अर्ज त्या त्या संबंधित प्रकल्प कार्यालयात स्वीकारले जाणार आहेत.

-------=================

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

Nepal Flood Alert : नेपाळच्या महापुरात नाशिकचे पर्यटक अडकले? जिल्हा प्रशासनाकडून तातडीने हेल्पलाइन क्रमांक जारी, पाहा लिंक आणि कंट्रोल रूम नंबर

‘I Love My बायको! रितेश असं बोलला तरी जेनिलिया रुसली, दोघांचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT