medical Student esakal
नाशिक

Medical Postgraduate Admissions : वैद्यकीय पदव्‍युत्तर प्रवेशाच्‍या परीक्षा अर्जाची 24 जूनपर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा

Medical Postgraduate Admissions : ऑल इंडिया आयुष पोस्‍ट ग्रॅज्‍युएट एन्ट्रन्स टेस्‍ट (एआयएपीजीईटी) २०२३ या परीक्षेच्‍या माध्यमातून पदव्‍युत्तर पदवी वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाणार आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्‍सीतर्फे यासंदर्भात सूचनापत्र जारी केलेले आहे. त्‍यानुसार पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी २४ जूनपर्यंत मुदत दिलेली आहे. (Deadline for Medical Postgraduate Admission Exam Application 24th June nashik news)

आयुष शाखेतील अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रवेशासाठी या परीक्षेच्‍या माध्यमातून प्रवेश दिले जाणार आहे. एनटीएतर्फे यासंदर्भातील सविस्‍तर वेळापत्रक जारी केलेले आहे. त्‍यानुसार ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरवात झालेली आहे.

आयुष शाखेतून पदवी उत्तीर्ण व पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने २४ जूनपर्यंत मुदत असेल. ऑनलाइन शुल्‍क भरण्यासाठी २५ जूनपर्यंत मुदत दिलेली आहे. प्रक्रियेतील पुढील टप्यांत विद्यार्थ्यांना २६ ते २८ जूनदरम्‍यान अर्जात दुरुस्‍तीची संधी उपलब्‍ध केली जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तर राष्ट्रीय पातळीवर येत्‍या ३१ जुलैला परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. ही प्रवेश परीक्षा दोन तासांची असणार आहे. आयुर्वेदासाठी इंग्रजी व हिंदी माध्यमातून परीक्षा देता येईल.

होमिओपॅथीकरिता केवळ इंग्रजी, सिद्धासाठी इंग्रजी व तमीळ, युनानीकरिता इंग्रजी व उर्दू माध्यमातून परीक्षा देण्याची संधी उपलब्‍ध असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जीवघेणा हल्ला, जनता दरबार सुरु असताना हल्लेखोर आला अन्...

Satara Rain update:'कराड-पाटण तालुक्यात मुसळधार; कराड-चिपळूण मार्ग वाहतूक बंद, अडकलेले कोकणात जाणारे 150 प्रवासी एसटी बसमधून रवाना

HDFC Bank Alert: HDFC ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बँकेच्या अत्यावश्यक सेवा दोन दिवस बंद राहणार

Dhanashree Verama: युझवेंद्र चहलच्या 'Sugar Daddy' टी शर्टवर धनश्रीची जोरदार टीका; म्हणाली, मी कोर्टात रडले आणि तो...

Pune Rain Update: पुण्यात पावसाचा हाहाकार! एकता नगरमध्ये पाणी शिरलं, खडकवासल्यातून विसर्ग वाढला

SCROLL FOR NEXT