Admission Sakal
नाशिक

नाशिक : एमबीबीएस, बीडीएसच्‍या ऑप्‍शन फॉर्मची २८ जानेवारी पर्यंत मुदत

३१ जानेवारीला पहिली निवडयादी होणार प्रसिद्ध

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम एमबीबीएस, (MBBS)तसेच दंतशास्‍त्र शाखेच्या बी. डीएस (BDS)अभ्यासक्रमाकरिता ऑप्‍शन फॉर्म (Option Form)भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. शुक्रवार (ता. २१)पासून २८ जानेवारीपर्यंत ऑप्‍शन फॉर्म भरण्याची मुदत असेल. ३१ जानेवारीला पहिली निवडयादी जाहीर केली जाणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्‍या प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. नीट परीक्षेतून पात्रता मिळविलेले विद्यार्थी या प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. या विद्यार्थ्यांना ऑनलाइन स्वरूपात नोंदणी करायची होती. नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ दिल्‍यानंतर आता पुढील प्रक्रियेला गती प्राप्त झाली आहे. पुढील टप्प्‍यात विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्राधान्‍यक्रम निवडीसाठी ऑप्‍शन फॉर्म सादर करायचे आहेत. सध्या एमबीबीएस, बीडीएस या शिक्षणक्रमांकरिता ऑप्‍शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. याअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून २८ जानेवारीपर्यंत ऑप्‍शन फॉर्म भरावयाचे आहेत. एमबीबीएस, बीडीएस यासाठी पहिली निवडयादी ३१ जानेवारीला सायंकाळी पाचला जाहीर केली जाणार आहे. या यादीतील विद्यार्थ्यांना प्रत्‍यक्ष वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्‍चितीसाठी १ ते ७ फेब्रुवारीपर्यंत मुदत असेल.

अन्‍य शिक्षणक्रमांचे वेळापत्रक लवकरच

सध्या एमबीबीएस व बीडीएस शिक्षणक्रमांसाठीचे वेळापत्रक जारी झालेले आहे. आयुर्वेद (बीएएमएस), होमिओपॅथी (बीएचएमएस), युनानी (बीयूएमएस), फिजिओथेरपी, बी. एस्सी. (नर्सिंग) अशा अन्‍य सर्व शिक्षणक्रमांच्‍या प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे.

गुणवत्तायादी आज

सर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांची सामान्‍य गुणवत्तायादी बुधवारी (ता. १९) दुपारी तीनला प्रसिद्ध केली जाणार आहे. तर तात्‍पुरती गुणवत्तायादी सायंकाळी सहाला प्रसिद्ध केली जाणार आहे. एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांच्या जागांचा तपशील गुरुवारी (ता. २०) प्रसिद्ध केला जाईल. शुक्रवार (ता. २१)पासून ऑप्‍शन भरायच्‍या प्रक्रियेला सुरवात होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Update: UPI MDR शुल्काला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; काय म्हणाले कोर्ट?

विद्यापीठाने काही घडलंच नाही हे सांगायला लावलं, अत्याचार प्रकरणावरून विद्यार्थीनींचे प्रशासनावर गंभीर आरोप

'गारंबीचा बापू' आला रे! कोकणच्या मातीतील बंडखोर कहाणी आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

World Rabies Day 2026: कुत्रा चावला नाही तरी रेबीजचा धोका? 'हे' गैरसमज आजच दूर करा!

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाणे काँग्रेस आक्रमक

SCROLL FOR NEXT