engineering admission esakal
नाशिक

Engineering Admission : अभियांत्रिकीच्‍या नोंदणीची या तारखेपर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा

Engineering Admission : इयत्ता बारावीनंतर अभियांत्रिकी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवेश प्रक्रियेला सुरवात झालेली आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्‍या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक विद्यार्थ्यांना ३ जुलैपर्यंत नोंदणी करायची आहे.

नोंदणीकृत विद्यार्थ्यांना प्रवेश फेरीत सहभागी होता येईल. (Deadline for registration of engineering till 3 july nashik news)

दरम्‍यान ४ वर्षे कालावधीचा पदवी अभ्यासक्रम तसेच पाच वर्षे कालावधीचा पदवी व पदव्‍युत्तर पदवी (संयुक्‍त) अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहे.

काही दिवसांपूर्वी एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्‍यापासून विद्यार्थ्यांसह पालकांना पुढील प्रवेश प्रक्रियेची प्रतीक्षा लागून होती. ही प्रतीक्षा संपली असून, नोंदणी प्रक्रियेला सुरवात झालेली आहे. एमएचटी-सीईटी परीक्षेत पीसीएम ग्रुपचे गुण आणि इयत्ता बारावीतील गुणांच्‍या आधारावर अभियांत्रिकी शाखेत प्रवेशाची संधी उपलब्‍ध होणार आहे.

राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शनिवार (ता.२४) पासून नोंदणी प्रक्रियेला सुरवात केली आहे. त्‍यानुसार विद्यार्थ्यांनी संकेतस्‍थळावर ऑनलाइन नोंदणी करून आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ३ जुलैपर्यंत मुदत दिलेली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या मुदतीत कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ४ जुलैपर्यंत मुदत असणार आहे. विद्यार्थी ई-स्‍क्रुटीनी किंवा प्रत्‍यक्ष स्‍क्रुटीनीचा पर्याय निवडून कागदपत्रे पडताळणी करू शकतील.

पुढील वेळापत्रकाची प्रतीक्षा

सध्या नोंदणीची मुदत जाहीर केलेली असून, प्रारूप व पुढे अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्धी व प्रवेश फेऱ्यांच्या वेळापत्रकाची अद्याप प्रतीक्षा कायम आहे. नोंदणीची मुदत संपल्‍यानंतर सविस्‍तर वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्‍यता आहे.

बी.फार्मसीची नोंदणी नाहीच

औषधनिर्माणशास्‍त्र शाखेतील पदवी अभ्यासक्रम बी.फार्मसीची नोंदणी सायंकाळी उशिरापर्यंत सुरु झालेली नव्‍हती. अभियांत्रिकीसोबतच फार्मसीच्‍या नोंदणीला सुरवात होणार असल्‍याचे सांगण्यात आले होते. परंतु संकेतस्‍थळावर यासंदर्भात तपशील जारी केलेला नव्‍हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT