Admission news esakal
नाशिक

12वीनंतरच्‍या पदविकेच्‍या अभ्यासक्रमासाठी शुक्रवारपर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : इयत्ता बारावीनंतरच्‍या पदविका अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी प्रक्रिया सुरु आहे. आधीच विलंब झालेला असताना, तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे पुन्‍हा नोंदणीसाठी मुदतवाढ दिली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार शुक्रवार (ता.२) पर्यंत मुदत असणार आहे. प्रवेश प्रक्रियेला होत असलेल्‍या विलंबामुळे यापूर्वी नोंदणी केलेल्‍या विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. (Deadline till Friday for Post 12th Diploma Courses Nashik News)

औषधनिर्माणशास्‍त्र (डी.फार्मसी), हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी तसेच सरफेस कोटिंग टेक्‍नॉलॉजी या विषयांसाठी इयत्ता बारावीनंतर पदविका अभ्यासक्रम उपलब्‍ध आहे. ९ जूनपासून पदविका अभ्यासक्रम प्रवेशासाठी प्रक्रिया सुरु आहे. वारंवार मुदतवाढ दिली जात असल्‍याने अद्यापपर्यंत कॅप राउंडचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही.

नुकताच मुदत संपत असताना, पुन्‍हा एकदा मुदत वाढ दिल्‍याने आता विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी शुक्रवार (ता.२) पर्यंत मुदत असेल. यापूर्वी नोंदणी केलेले व नव्‍याने नोंदणी केलेल्‍या विद्यार्थ्यांना या कालावधीत कागदपत्रे पडताळणी करून घेता येईल. त्‍यासाठी इ.-स्‍क्रुटीनी किंवा प्रत्‍यक्ष स्‍क्रुटीनी असे दोन पर्याय उपलब्‍ध असतील.

सध्याच्‍या वेळापत्रकानुसार नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर ४ सप्‍टेंबरला प्रारूप गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचे नियोजित आहे. या यादीसंदर्भात तक्रार, हरकती नोंदविण्यासाठी ७ सप्‍टेंबरपर्यंत मुदत असणार आहे. ८ सप्‍टेंबरला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार असून, त्‍याआधारे कॅप राउंडची पुढील प्रक्रिया पार पडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT