Link Aadhaar to ration card.
Link Aadhaar to ration card.  esakal
नाशिक

Ration Card Aadhaar Linkage : शिधापत्रिकेला आधार कार्ड जोडण्यासाठी या तारखेपर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा

Ration Card Aadhaar Linkage : सर्व शिधापत्रिकांनी आपल्या शिधापत्रिकेला आधार कार्ड व मोबाइल क्रमांक लिंक करावा. टाळाटाळ केल्यास धान्याचे वितरण थांबवून रेशन कार्डसुद्धा रद्द करण्यात येईल. त्यामुळे ३१ मेपर्यंत आधार, मोबाईल क्रमांक शिधापत्रिकेला जोडण्याचे आवाहन तहसीलदार आबा महाजन यांनी केले आहे. (Deadline to link Aadhaar card to ration card till this date nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

लाभार्थींनी स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई-पॉस उपकरणाद्वारे रास्तभाव दुकानदारांमार्फत शिधापत्रिकेस आधार कार्ड व मोबाइल क्रमांक जोडावेत. शिधापत्रिकेत उल्लेख असलेल्या प्रत्येक सदस्याचे आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक आहे.

त्यासाठी ३१ मेपर्यंतची मुदत असून, त्यानंतर आधार लिंक नसलेल्या शिधापत्रिका रद्द करण्यात येतील. तालुक्यातील आधार कार्डशी शिधापत्रिका लिंक न झालेल्या लाभार्थ्यांची यादी दुकाननिहाय तयार करण्यात आली आहे.

त्यानुसार बहुतांश लाभार्थ्यांचे आधार लिंक करणे प्रलंबित असून, संबंधित लाभार्थ्यांनी त्वरित रास्त भाव दुकानदारांशी संपर्क साधून आधार लिंक करावे, असेही श्री. महाजन यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

SCROLL FOR NEXT