sppu  esakal
नाशिक

Nashik News: अभ्यासक्रम, संशोधन केंद्र मान्‍यतेसाठी 30 पर्यंत मुदत

पुणे विद्यापीठातर्फे महाविद्यालयांसाठी सूचना जारी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्‍नित महाविद्यालये आणि परिसंस्‍थांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता मान्‍यता प्रस्‍ताव सादर करण्याबाबत सूचना जारी केलेली आहे.

नवीन अभ्यासक्रम, विद्याशाखेसह संशोधन केंद्र आदींच्‍या मान्‍यतेसाठी ३० सप्‍टेंबरपर्यंत प्रस्‍ताव सादर करण्याच्‍या सूचना दिल्‍या आहेत. (Deadline up to 30 for syllabus research center recognition Nashik News)

पुणे विद्यापीठाने जारी केलेल्‍या सूचनापत्रात नमूद केले आहे, की शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी संलग्‍नित महाविद्यालयांनी मान्‍यता दिलेल्‍या अभ्यासक्रमांचे नूतनीकरण, स्‍थायी संलग्‍निकरण, मान्‍यता व नैसर्गिकवाढ करण्याबाबत प्रस्‍ताव सादर करता येतील.

तसेच, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता नवीन संशोधन केंद्र संलग्‍नित महाविद्यालये, मान्‍यताप्राप्त परिसंस्‍थेतील नवीन संशोधन केंद्र, संशोधन केंद्रात नवीन विषय, अभ्यासक्रमांना मान्‍यतेसाठी प्रस्‍ताव सादर करता येतील.

याशिवाय, इच्‍छुक महाविद्यालयांना वर्षात नवीन पाठ्यक्रम, विषय, विद्याशाखा, तुकडी, प्रवेशक्षमता वाढ, विशेषस्‍तर विषय मान्‍यतेसाठी प्रस्‍ताव सादर करण्याच्‍या सूचना केल्‍या आहेत.

दरम्‍यान, अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या महाविद्यालयांच्‍या प्रस्‍तावांना मान्‍यता दिली जाणार असल्‍याचे स्‍पष्ट करण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रस्‍ताव सादर करण्याची अशी आहे प्रक्रिया

विद्यापीठाच्‍या संकेतस्‍थळावरील बीओडी ऑनलाइन या पर्यायावरील लिंकवरून काळजीपूर्वक अर्ज भरण्यास सांगितले आहे.

सक्षम अधिकाऱ्यांच्‍या स्‍वाक्षरी व शिक्‍क्‍यानिशी तसेच विहित शुल्‍कासह व आवश्‍यक कागदपत्रांबरोबर ३० सप्‍टेंबर किंवा त्‍यापूर्वी कार्यालयीन वेळेत विद्यापीठाच्‍या विभागाकडे प्रस्‍ताव जमा करायचे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT