नाशिक

२३१ शेतकरी कर्जमाफी

CD
धुळे : टुडे पान १ साठी.. अँकर -- जिल्ह्यातील २३१ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा दिलासा! -- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी जाहीर सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २४ : शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत चौथी यादी जाहीर केली. या नव्या यादीत जिल्ह्यातील आणखी २३१ पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यभरातील एक लाख १५ हजार ६९७ शेतकऱ्यांना यामुळे कर्जमुक्तीचा थेट लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपल्या कर्जथकबाकीची योग्य खातरजमा करून नजीकच्या आपले सेवा केंद्रावर लवकरात लवकर आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यभरात आतापर्यंत २५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यात लाभार्थ्यांची संख्या २५ लाख ८२ हजार ८२७ वर पोहोचली आहे. या योजनेअंतर्गत एक एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेली, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेली आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न केलेली पीककर्जे, तसेच पुनर्गठित व फेरपुनर्गठित कर्जांचा समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांना थेट दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा मोठा लाभ देण्यात येत आहे. चौथ्या यादीतील शेतकऱ्यांच्या कर्जथकबाकीसाठी ३१ मार्च २०२६ ही तारीख निश्चित करण्यात आली असून, नंतरचे व्याज व अन्य खर्च माफ करण्यात येणार आहेत. तसेच, राष्ट्रीयीकृत बँकांमधील काही शेतकऱ्यांची थकबाकी २ लाखांपेक्षा जास्त असली, तरी शासनाच्या ‘हेअरकट’ धोरणानुसार संबंधित कर्जे पूर्णपणे निरंक करण्यात येणार आहेत. चौथ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांची नावे संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी विकास संस्था आणि ग्रामपंचायतींच्या कार्यालयांमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहेत. - पात्र शेतकऱ्यांचा समावेश चौथ्या यादीत जिल्ह्यातील २३१ पात्र शेतकऱ्यांचा समावेश असून पैकी १८२ शेतकरी हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संबंधित आहेत. तर उर्वरित ४९ शेतकरी इतर राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांशी संबंधित आहेत. ज्या शेतकऱ्यांची एकापेक्षा अधिक बँकांमध्ये पीककर्ज खाती आहेत, अशा पात्र शेतकऱ्यांचा देखील या विशेष यादीत समावेश करण्यात आला आहे. केवळ धुळे जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण नाशिक विभागातील १४ हजार १६५ शेतकऱ्यांची नावे या चौथ्या यादीत प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

Gold Jewellery Price: लग्नासाठी सोनं आत्ताच खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी? सोन्याचा भाव 1 लाखांपर्यंत येणार?

''पाकिस्तान आमचं संरक्षण करतोय, भारताकडून आता अपेक्षा नाही'', माजी मुख्यमंत्र्याच्या विधानानं खळबळ

ड्रायव्हिंग लायसन्स काढणं होणार कठीण! ऑनलाइन परीक्षेत आता ७५% गुणांची अट, केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

VIRAT KOHLI: विराट कोहलीचा सराव सुरू, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेचा थरार कधी रंगणार? जाणून घ्या ५ सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्याच्या कोरंभी बायपासवर भीषण अपघात; वाहतूक पोलिसाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT