नाशिक

कर्ज माफीची चौथी यादी

CD
सुमारे सात हजार शेतकऱ्यांना ४५ कोटींचा लाभ --- शेतकरी कर्जमुक्ती योजना; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ४ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत राज्यातील चार कोटी ८७ लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार ७६५ कोटी रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येत आहे. यात जळगाव जिल्ह्यातील सहा हजार ९७६ शेतकऱ्यांना ४५ कोटी ७० लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे. शासनाने २ जून २०२६ ला शासन निर्णयान्वये ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या, तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेल्या पीककर्ज व पुनर्गठित अथवा फेरपुनर्गठित कर्जासाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून, यासाठी शासनाने महाआयटीची नियुक्ती केली आहे. बँकांनी योजना पोर्टलवर एकूण ३१ कोटी १७ लाख थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड केली आहे. महाआयटीने संगणकीय संस्करण केलेल्या माहितीनुसार आतापर्यंत चार याद्यांद्वारे एकूण २५ लाख ८२ हजार ८२७ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी जाहीर झाली आहे. आतापर्यंत आधार प्रमाणीकरण झालेल्या शेतकऱ्यांपैकी १५ कोटी ८५ लाख पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यात १३ हजार २७५ कोटी रुपये जमा झाले आहेत. चार कोटी ८७ लाख पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर चार हजार ७६५ कोटी रुपये जमा करण्यात येत असून, यामुळे एकूण २० कोटी ७२ लाख पात्र शेतकऱ्यांना १८ हजार ४० कोटी रुपयांचा कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. यात जिल्ह्यातील सहा हजार ९७६ शेतकऱ्यांचा सामावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: घरची परिस्थिती जेमतेम, पण शिक्षणाची जिद्द कायम; राजश्री साळवेची भूमी अभिलेख विभागात निवड, कष्ट अन् जिद्दीला यशाची साथ

Sugar Prices: सर्वसामान्यांची दिवाळी कडू! सणाच्या तोंडावरच साखरेचे दर वाढले; सध्याचे भाव काय?

Latest Marathi News Live Update : शरद पवार मुंबईतील ब्रीजकँडी रुग्णालयात दाखल

Pune News: CSR निधीतून सुविधा देऊन खासगी बँकांकडून कोट्यवधींच्या ठेवींची जुळवाजुळव? अनास्करांची RBI कडे तक्रार

Jalna News: तहसीलदारांसमोरच लिपिक अन् कोतवाल भिडले! अंबड तहसील कार्यालयात फ्रीस्टाइल हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT