Jal Jeevan Mission  esakal
नाशिक

Jal Jeevan Mission : जलजीवनच्या कामांना मुदतवाढ देण्याच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक कामांना मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा

Jal Jeevan Mission : जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांच्या कामांना मुदतवाढ देण्याचे अनेक प्रस्ताव प्रलंबित असल्याची ओरड होती.

अखेर, ही ओरड लक्षात घेऊन मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी मुदतवाढ देण्याचे अधिकारांचे विकेंद्रीकरण केले आहे. (Decentralization of powers to grant extension of aquatic works jal jeevan mission nashik news)

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक कामांना मुदतवाढ देतील. त्यामुळे जलजीवनची कामे वेळात पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत ४५ कामांना मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती मित्तल यांनी दिली. तसेच आणखी २० कामांनाही मुदत वाढ दिला जाणार असल्याची त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून जलजीवन मिशनची सुरू असलेली कामे पूर्ण करण्यासाठी केवळ तीन महिन्यांची मुदत शिल्लक असतानाही ३२ पाणी पुरवठा योजनांची कामे अद्याप सुरू झालेली नसल्याचे समोर आले आहे.

या योजना फेरआराखडे तयार करण्याच्या कारणामुळे अद्याप सुरूच झालेल्या नाहीत. ग्रामीण पुरवठा विभागाकडील आकडेवारीनुसार आतापर्यंत २०० योजनांची कामे पूर्ण झाली असून १०२२ कामे प्रगतिपथावर आहेत.

यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभागासमोर पुढील तीन महिन्यांमध्ये ८२८ योजना पूर्ण करण्याचे आव्हान आहे. या आशयाची बातमी ‘सकाळ’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती.

या वृत्ताची दखल घेत मित्तल यांनी जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनांचा आढावा मंगळवारी (ता.१६) घेतला. यात कामांची सद्यःस्थिती काय आहे, अडचणी काय आहे याची माहिती जाणून घेतली.

उपअभियंते, कार्यकारी अभियंते यांच्याकडून आढावा घेतल्यानंतर ३१ मार्च २०२४ अखेर एक हजार योजना पूर्ण होतील, असे नियोजन असल्याचे मित्तल यांनी सांगितले. काही तांत्रिक चुकांमुळे पाणी पुरवठा योजनांना मुदतवाढ देण्याचे प्रस्ताव प्रलंबित होते. सदर प्रस्ताव पडून होते.

मात्र, आता मुदतवाढ देण्याचे अधिकारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रकल्प संचालक यांना दिले आहेत. ४५ योजनांचे मुदतवाढीचा प्रस्ताव होता. त्यास मान्यता दिली आहे. आणखी २० योजनांचे मुदतवाढीचे प्रस्ताव आहे. यावरही लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. ३२ योजनांचे फेर आराखडे तयार करून मंत्रालयात मंजुरीसाठी दाखल केलेले आहेत. त्याचा पाठपुरावा सुरू असल्याचे मित्तल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

Viral Video: मृत्यूच्या दारातून परत आला... रामकुंडात अडकला तरूण, गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ! थरारक व्हिडिओ व्हायरल

Nashik Crime Branch : चहासाठी थांबले अन् पोलिसांनी पकडले; स्कॉर्पिओतून तलवारी व चॉपर जप्त

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

SCROLL FOR NEXT