covid patients
covid patients esakal
नाशिक

कोविड रुग्णसेवा अखंडितपणे सुरू ठेवणार; हॉस्पिटल ओनर असोसिएशन

विक्रांत मते

नाशिक : कोरोनाग्रस्त रुग्णांना( corona patients) दाखल करून न घेण्याचा एकतर्फी निर्णय हॉस्पिटल असोसिएशनने (hospital association) मागे घेतला. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा बडगा उगारल्यानंतर असोसिएशनने घूमजाव करीत रुग्णसेवा बंद करण्याचा निर्णय घेतलाच नव्हता, असा पवित्रा घेत, समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर कोविड रुग्णसेवा अखंडितपणे सुरू ठेवण्याचे जाहीर केले. यासंदर्भात असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रमाकांत पाटील, उपाध्यक्ष डॉ. राज नगरकर यांनी माहिती दिली. (decision-of-Hospital-Owners-Association-continue-covid-patient-service-nashik-marathi-news)

डॉक्टरांवर प्रशासनाकडून येणाऱ्या दबावामुळे घेतला होता निर्णय

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून, रुग्णालयांमध्ये ८० टक्के खाटा राखीव असून, त्यावर अन्य रुग्णांना दाखल करता येत नाही. दुसरीकडे राज्य शासनाने खासगी रुग्णालयांमधील उपचाराचे दर कमी करण्याचे परिपत्रक जारी केले आहे. महापालिकेने आर्थिक लूट थांबविण्यासाठी लेखापरीक्षकांना कडक सूचना दिल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर हॉस्पिटल ओनर असोसिएशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी, महापालिका व पोलिस आयुक्तांना पत्र पाठवून कोरोना रुग्णसेवा बंद करीत असल्याचे जाहीर केले होते. रुग्णसंख्या घटल्याने व रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी मानसिक व शारीरिकदृष्ट्या थकल्याने हा निर्णय घेत असल्याचे पत्रात म्हटले होते. या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्त जाधव कैलास जाधव यांनी असोसिएशनच्या शिष्टमंडळाशी मुख्यालयात बुधवारी (ता. २) चर्चा केली. कोरोना रुग्णांची सेवा करताना येणाऱ्या अडचणी, सामाजिक व मानसिक दबाव, सोशल मीडियाच्या माध्यमातून डॉक्टारांची होणारी बदनामी, ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी डॉक्टरांवर प्रशासनाकडून येणाऱ्या दबावामुळे कोरोना रुग्णसेवा बंद करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केल्याचा दावा केला.

असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी स्थायी समिती सभापती गणेश गिते यांच्याशीही चर्चा केली. त्यानंतर कोविड रुग्णसेवा बंद करण्याचा निर्णय मागे घेतल्याचे जाहीर केले. असोसिएशनचे सचिव डॉ. सचिन देवरे, खजिनदार डॉ. ज्ञानेश्वर थोरात, डॉ. समीर अहिरे, डॉ. श्‍याम पाटील, डॉ. सुनील जगताप, डॉ. अमोल वाजे, डॉ. देवेंद्र येवले आदी उपस्थित होते.

असोसिएशनने कोविड रुग्णालये बंद करण्याचा निर्णय घेतला नाही. बंदसाठी फक्त परवानगी मागितली होती. आयुक्तांसमोर समस्या मांडल्या आहेत. सामंजस्याने तोडगा काढण्याचे आश्‍वासन देण्यात आले. यापुढेही कोविड रुग्णसेवा अखंडितपणे सुरू राहील. रुग्णांच्या आर्थिक लुटीचे समर्थन करीत नाही. -डॉ. रमाकांत पाटील, अध्यक्ष, हॉस्पिटल ओनर असोसिएशन, नाशिक

रुग्णालयांची दादागिरी खपवून घेणार नाही. साथरोग प्रतिबंधक कायदा लागू असताना, रुग्णालये बंद करण्याचा निर्णय घेणे योग्य नव्हते. असोसिएशनच्या समस्यांचे निराकरण केले जाईल. ऑक्सिजन पुरवठ्याचा विषय जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित असून, चर्चेतून त्यावर मार्ग काढू. -कैलास जाधव, आयुक्त, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BAN vs IND women T20 : टीम इंडिया शेवटही करणार गोड.? आज बांगलादेशविरुद्ध अखेरचा सामना

Salman Khan Firing Case: फक्त सलमान खानच नाही, तर इतर दोन प्रसिद्ध अभिनेतेही होते बिश्नोई गँगच्या रडारवर

CM Shinde : अभिनेत्याचा 'कार'नामा! सी-लिंकवर टोल वाचावा म्हणून मुख्यमंत्र्याच्या ताफ्यातून नेली कार; पोलिसांनी शिकवली अद्दल

VIDEO: दुबईत भर कॉन्सर्टमध्ये चक्क स्टेजवर नखं कापली; अरिजित सिंगचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "भावा ही कामं घरी कर!"

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT