omicron esakal
नाशिक

नाशिकमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला | Omicron

विक्रांत मते

नाशिक : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या (coronavirus) ओमिक्रॉन (Omicron) व्हेरियंटने (omicron) सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी आज मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली होती.

शाळा सुरू करण्याचा निर्णय 10 डिसेंबरपर्यंत पुढे

गेल्या दीड ते पावणेदोन वर्षांपासून ऑनलाइन अभ्यासाचे धडे गिरविणाऱ्या विद्यार्थ्यांना एक डिसेंबरपासून शाळेत जाण्याचा मार्ग शासनाने मोकळा केला असला तरी ‘ओमिक्रॉन’ या नव्या विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे महापालिका प्रशासनाने पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय दहा डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकला आहे.

लसीकरणाचे उद्दिष्ट अद्यापपर्यंत पूर्ण झाले नाही

गेल्या वर्षाच्या मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर केंद्र सरकारने देशभरात लॉकडाउन जाहीर केला. पहिल्या लाटेने हाहाकार उडविल्यानंतर या वर्षाच्या जानेवारी महिन्यात पुन्हा दुसरी लाट सुरू झाली. मे महिन्यापर्यंत दुसरी लाटदेखील ओसरली. आता तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दरम्यान २६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. लसीकरणाचे उद्दिष्ट अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही. या दरम्यान शाळा बंद करण्यात आल्या होत्या. चार ऑक्टोबरपासून शहरी भागातील आठवी ते बारावी, तसेच ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर एक डिसेंबरपासून पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी जाहीर केला.

एक डिसेंबरला शाळा सुरू होणार असल्याने शाळा व्यवस्थापनांसह पालकांची तयारी झाली असतानाच ‘ओमिक्रॉन’ या नव्या व्हेरियंटमुळे केंद्र व राज्य शासनाने कोरोनाविषयक नियम अधिक कठोर केले आहे. त्यामुळे सावधगिरीचा भाग म्हणून महापालिका हद्दीतील खासगी व शासकीय शाळा एक डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला. दहा डिसेंबरनंतर शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय बैठकीनंतर घेतला जाणार आहे. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी खाते प्रमुखांच्या बैठकीत निर्देश दिले आहे.

लग्नकार्यांवर असेल नजर

मंगल कार्यालये, लॉन्सची तपासणी मंगल कार्यालये व लॉन्स, तसेच लग्नकार्य होणाऱ्या भागात अचानक तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी अठरा पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, दोन डोस घेतलेले नसल्यास अशांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्याचबरोबर परदेशातून आलेल्या नागरिकांचा अहवाल राज्य शासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेला प्राप्त झाल्यानंतर तपासणी करून संस्थात्मक विलगीकरण केले जाणार असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

''ओमिक्रॉनमुळे सावधगिरीचा भाग म्हणून पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहा दिवसांची परिस्थिती बघून निर्णय घेवू.'' - कैलास जाधव, आयुक्त, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : शिवसेना पक्ष, चिन्ह संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी

Atiq Ahmed Son Accident Video: अतिक अहमदच्या मुलाचा अपघात कसा झाला? कार डिव्हायडरला धडकली अन् हवेत उडाली, Live Video Viral

Scam 2010 Marathi Actor: SCAM 2010 मध्ये झळकणार मराठमोळा चेहरा; तुम्ही ओळखलंत का या अभिनेत्याला? पत्नी गाजवतेय मराठी मालिका

YCMOU Exam: धक्कादायक! एकाच विद्यार्थ्याने एकाच वेळी दिल्या दोन परीक्षा, 'मुक्त'च्या परीक्षेत ४० जणांचा प्रताप; विद्यापीठाकडून दखल

Ethanol Production Restrictions: उसापासून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध?; साखरेचे भाव नियंत्रणासाठी उत्पादन वाढविणार

SCROLL FOR NEXT