amit deshmukh esakal
नाशिक

वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलणार? शासनाला पाठविणार फेरप्रस्‍ताव

अरूण मलाणी

नाशिक : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर (corona virus) राज्यातील कडक निर्बंध (lockdown) १ जूनपर्यंत वाढविले आहेत. अशात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या येत्‍या २ जूनपासून सुरु होणाऱ्या परीक्षांबाबत लवकरच निर्णय जाहीर होण्याची शक्‍यता आहे. परीक्षेच्‍या वेळापत्रकाबाबत फेरप्रस्‍ताव शासनाला पाठविण्याचे निर्देश विद्यापीठाचे प्रति कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी शनिवारी (ता.१५) दिले आहेत. (decision on medical examinations said amit deshmukh)

वैद्यकीय परीक्षांच्‍या वेळापत्रकाचे फेरप्रस्‍ताव शासनाला सादर करण्याचे आदेश

मंत्री देशमुख यांच्‍या अध्यक्षतेखाली परीक्षांच्या वेळापत्रकांबाबत आढावा बैठक ऑनलाईन पध्दतीने झाली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव विजय सौरभ, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, विद्यापीठाचे विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंबरे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक आदी सहभागी झाले होते.

चर्चा करुन निर्णय घेण्याच्‍या सूचना

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या येत्‍या २ जूनपासून विविध विद्याशाखांच्या हिवाळी-२०२० पदवी परीक्षा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत घेण्याबाबतचा निर्णय यापूर्वी झालेला होता. परंतु राज्‍यातील कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती पहाता, तसेच राज्यातील कडक निर्बंध लागू असल्‍याने परीक्षेच्या नियोजनासंदर्भात तसेच वेळापत्रकासंदर्भात सर्व संबंधितांनी चर्चा करुन निर्णय घ्याण्याच्‍या सूचना .देशमुख यांनी दिल्‍या. तसा प्रस्ताव शासनास मान्यतेस्तव सादर करण्यास सांगितले आहे. पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी-२०२१ परीक्षा २४ जूनपासून नियोजित होत्या. या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केलेला आहे. परीक्षेचे वेळापत्रक जाहिर होणे आवश्यक आहे. त्यामुळे वेळापत्रकाबाबत सर्व संबंधितांनी चर्चा करुन निर्णय घेण्यास देशमुख यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia Ukraine Ceasefire : रशिया-युक्रेन युद्धबंदीच्या ठरावादरम्यान भारत अनुपस्थित, अमेरिकेनीही घेतला नाही सहभाग; झेलेन्स्कींना झटका !

T20 World Cup: पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाची देहबोली बदलली; सरावातही लक्षणीय बदल

Holi 2026: बरसाना विसरा! 'या' गावात महिला मारतात लाठ्या आणि पुरुष नाचतात साडी नेसून; लट्ठमार होळीचे हे ठिकाण माहीत आहे का?

Kolhapur Corporaters Dispute : कोल्हापूर महापालिकेत शारंगधर देशमुख-आदिल फरास यांच्यात जोरदार वाद, टेबल आपटण्याचा प्रकार; महापौरांनी केला हस्तक्षेप

UP Police: पोलिसांचा थरार! 'गो-तस्कर' कमरे हसनचा हाफ एन्काउंटर; अंधाराचा फायदा घेऊन ६ साथीदार पळाले

SCROLL FOR NEXT