nmc esakal
नाशिक

Nashik News : 6 मिळकती BOT तत्त्वावर विकसितचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : चालु आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये बीओटीच्या माध्यमातून महापालिकेच्या मिळकती विकास करण्याचा कार्यक्रम गुंडाळला असताना आता पुन्हा प्रशासनाकडून सहा मिळकती बीओटी तत्त्वावर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यासाठी यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या सल्लागार संस्थेचीच नियुक्ती केली जाणार आहे. भाजपच्या सत्ताकाळात २१ मिळकतीचे बीओटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्षात बारा मिळकती बीओटीवर विकसित करण्याचे ठरले. (Decision to develop 6 incomes on BOT basis Nashik NMC News)

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

मिळकती विकसित करण्यासाठी सहा सदस्यांची समिती गठित करण्यात आली आहे. आयुक्त समितीचे अध्यक्ष तर सदस्य सचिव म्हणून प्रशासन उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त (शहर), शहर अभियंता, मुख्य लेखापरीक्षक, मुख्य लेखापाल यांचा समावेश आहे.

सल्लागार संस्थेने ६० वर्षाच्या भाडे पट्ट्यावर मिळकती देण्याची शिफारस केल्याचे समजते. सर्व्ह क्रमांक ७०८, अंतिम भूखंड क्रमांक ४५० नवरचना विद्यालय, मधुर स्वीट्स आरक्षण क्रमांक २३० (पै) अंतिम भूखंड क्रमांक ४५९, मॅग्नम हॉस्पिटल गंगापूर रोड, सर्वे क्रमांक १०४/ब. सातपूर टाऊन हॉल, सर्वे क्रमांक ४८८/अ/ब द्वारका जुने मलेरिया कार्यालय, अंतिम भूखंड क्रमांक १६०, बी. डी. भालेकर हायस्कूल, सर्वे क्रमांक २/अ, महात्मा गांधी टाऊन हॉल नाशिक रोड या मिळकतींचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Muktainagar News : मुक्ताईनगरात गुलाल उधळला! आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील नगराध्यक्षपदी विजयी

Vasai Virar Election : चिन्हांच्या खेळात अडकली महाविकास आघाडी व बहुजन विकास आघाडीची युती; वसई-विरारमध्ये राजकीय गोंधळ उभा!

अलिबागमधील 'या' गावात आहे रवी जाधव यांचं टुमदार फार्महाउस; फोटो पाहिलेत का? कासवाशी संबंधित आहे घराचं नाव

Latest Marathi News Live Update : जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात विक्रमी वाढ

Viral Video : ''मॅडम माझ्या मुलीला मारू नका, तिला आई नाहीये'', भर वर्गात वडीलांना अश्रू अनावर; बाप-लेकीचा भावूक करणारा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT