Corona Vaccination centre latest marathi news esakal
नाशिक

Nashik : शहरात 24 तास लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय

विक्रांत मते

नाशिक : कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने (NMC) शहरात १५ जुलैपासून ३४ केंद्रे सुरू केली आहेत.

त्याचबरोबर आता नव्याने डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय व नाशिक रोडच्या नवीन बिटको रुग्णालयात लसीकरण (Vaccination centre) करण्यासाठी २४ तास सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. (Decision to start 24 hours vaccination center in city nashik Latest Marathi news)

मोठ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. तिसरी लाट सौम्य ठरण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे ठरले होते. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोफत बूस्टर डोस देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यानुसार महापालिका हद्दीमध्ये नियमित लसीकरण व बूस्टर डोस देण्यासाठी ३४ लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारपासून नियमित लसीकरणासह बूस्टर डोस सुरू करण्यात आले आहेत.

शहरात १३ लाख २९९ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, तर दहा लाख ५८ हजार ६५२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत ७४ हजार ९३८ नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. ही टक्केवारी अवघे सहा टक्के आहे.

सात लाख २५ हजार नागरिकांनी अद्याप बूस्टर डोस घेतला नसल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली. दरम्यान, ७५ दिवसांमध्ये बूस्टर डोसचा टप्पा करण्यासाठी जुने नाशिकमध्ये डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय व नाशिक रोडच्या बिटको रुग्णालयात २४ तास लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Rain Forecast : गुड न्यूज! महाराष्ट्रात पुन्हा पावसाला पोषक हवामान; गणेशोत्सव काळात जोरदार पावसाचा अंदाज

Amruta Fadnavis: गरबा सर्वसमावेशक उत्सव; मुस्लिमांच्या प्रवेशाला विरोध का? अमृता फडणवीस यांची भूमिका

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

SCROLL FOR NEXT