deepak pande
deepak pande esakal
नाशिक

राज ठाकरे कार्यकर्त्यांना समज द्या! - नाशिक पोलीस आयुक्त

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : नाशिक महापालिका निवडणुकीच्या (nashik muncipal corporation) पार्श्वभूमीवर मनसेने (MNS) चांगलीच कंबर कसली आहे. राज ठाकरे (Raj thackeray) नाशिक दौऱ्यादरम्यान मनसेकडून पोलिसांची परवानगी न घेता शहरात विनापरवानगी हॉर्डींग लावण्यात आले. त्यावरून आता हा हॉर्डिंग वॉर चांगलाच तापला आहे, यानंतर आज (ता.२३) पोलीस आयुक्त दीपक पांडे (police commissioner deepak pandey) यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना समज देण्याची विनंती केली. दरम्यान काल (ता.२२) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजकीय फलक पोलिसांनी महापालिकेच्या पथकांकडून काढून घेतले. दरम्यान, ही कारवाई सुरू असताना मनसे पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालत कारवाईस विरोध दर्शवला. मात्र, पोलिस संरक्षणात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने फलक काढून घेतले.

नियम मोडाल तर.....- पो. आ. दीपक पांडे

पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी शहरात कोणत्याही प्रकारचे फलक लावण्यासाठी पोलिसांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. आगामी सण उत्सव, निवडणुकांमुळे फलकबाजीवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने फलक लावण्यासाठी त्यावरील मजकूर पोलिसांकडून मंजूर करणे आवश्यक आहे. त्यानंतर पोलिसांचा व मनपाचा परवानगी क्रमांक मिळाल्यानंतर फलक लावता येणार आहे. पोलिस आयुक्तांनी हा आदेश शुक्रवारी (ता.१७) काढला. मात्र, त्याच्या तीन दिवसांनीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबई नाका परिसरात मोठ्या प्रमाणात फलकबाजी करण्यात आली. राजकीय फलकबाजीमुळे परिसरातील दिशादर्शक व परिसराची माहिती देणारे फलक झाकले गेले. स्थानिक नागरिकांमध्येही याबाबत नाराजी होती. मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या नोटीसनंतरही मनसेकडून फलक काढण्यात आले नाही. त्यामुळे पोलिसांनी याचा अहवाल मनपाकडे दिला. त्यानंतर मनपाच्या अतिक्रमण विभागाने पोलिस संरक्षणात परिसरातील सर्व राजकीय फलक काढून घेतले. या कारवाई दरम्यान, मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांनी केलेल्या दाव्यानुसार रीतसर शुल्क भरून मनपाकडून परवानगी घेत फलक लावल्याचे सांगितले. तसेच, त्यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी कारवाईस विरोध दर्शवला होता, मात्र मनपाने सर्व फलक काढून घेत परिसर फलकमुक्त केला.

पोलीस आयुक्त दीपक पांडे राज ठाकरेंच्या भेटीला

मनसेकडून पोलिसांची परवानगी न घेता शहरात विनापरवानगी हॉर्डींग लावण्यात आले. यानंतर आज (ता.२३) पोलीस आयुक्त दीपक पांडे (police commissioner deepak pandey) यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना समज देण्याची विनंती केली. तसेच राज ठाकरे हे एका समजदार पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समज देण्याची विनंती केली. तसेच नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT