नाशिक

एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक पाटील यांचा एक्सलन्स अवॉर्डने गौरव

CD
27385 बाभूळगाव :प्राचार्य डॉ. दीपक पाटील यांचा रुपेश दराडे. प्राचार्य डॉ. दीपक पाटील यांचा एक्सलन्स अवॉर्डने गौरव सकाळ वृत्तसेवा येवला, ता. २ : शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, प्रभावी शैक्षणिक नेतृत्व आणि संस्थात्मक विकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेत बाभूळगाव येथील एस.एन.डी. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक पी. पाटील यांना प्रतिष्ठेचा आयईआय एनएमएमसी एक्सलन्स अवॉर्ड प्रदान करण्यात आला. द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), नवी मुंबई यांच्या वतीने अ‍ॅग्नेल चॅरिटीज आणि फ्र. सी. रॉड्रिग्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा सन्मान प्रदान केला जातो. शैक्षणिक उत्कृष्ट प्राचार्य/संचालक प्रवर्ग या विभागात त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. डॉ. पाटील यांनी शैक्षणिक नेतृत्वाच्या माध्यमातून अभियांत्रिकी महाविद्यालय, संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रसार, संशोधनाला प्रोत्साहन, नवोपक्रमांना चालना आणि शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी केलेले कार्य याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरम्यान,प्राचार्य डॉ. पाटील यांचा हा सन्मान झाल्याबद्दल एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालयात जगदंबा शिक्षण संस्थेचे संचालक रुपेश दराडे यांच्या हस्ते यांचा सत्कार करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार किशोर दराडे,सरचिटणीस कुणाल दराडे, संचालक रुपेश दराडे,सिद्धांत दराडे तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपसंचालक डॉ. डी.पी.क्षिरसागर,संस्थेचे प्रशासकीय अधिकारी समाधान झाल्टे, समन्वयक सुनील पवार आदींनी डॉ. पाटील यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Change Health Tips: पुण्यात पावसाची जोरदार हजेरी; बदलत्या हवामानात आजारी पडू नये म्हणून करा ५ गोष्टी!

Lanja Machal ST Bus Service Historic Event : स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर कोकणातील ३५०० फूट उंचीवरील दुर्गम 'माचाळ' गावात पहिल्यांदाच धावली लालपरी

मला लहानपणापासूनच लग्न करायचं होतं पण... अजूनही अविवाहित का आहे ३४ वर्षांची वैदेही परशुरामी? म्हणते- मी प्रेमात पडले...

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा बँकेतील तारण कर्जाचे सोने बनावट, गोपीचंद पडळकरांचा आरोप

FD Rates: सरकारी बँकेने FD वरील व्याजदर वाढवले; नवीन योजनाही सुरू! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार इतकं व्याज, दिवाळीआधी गुंतवणुकीची संधी?

SCROLL FOR NEXT