NSK26H33106
जळगाव : आर्थिक गुन्हेशाखेच्या पथकाने दिपेश रुपानी याला अटक केली. संशयिताला अटक करणाऱ्या पथकासह पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, निरीक्षक नितीन पाटील आदी.
---
कंपनीत गुंतवणुकीच्या नावे सव्वा कोटींचा गंडा
म्होरक्या बडनेरा रेल्वेस्थानकावर अटक; धावत्या रेल्वेतून पळताना पोलिसांची झडप
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २० : थेट उत्पादने विक्री करणाऱ्या एका कंपनीच्या नावे नागरिकांना १ कोटी २३ लाख ८६ हजार रुपयांचा गंडा घालून वर्षभरापासून फरार असलेला संशयित दीपेश कमलेश रूपानी (रा. सुमन रेजिडेन्सी, जळगाव) याला जळगाव आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिनेस्टाइल पाठलाग करून बडनेरा रेल्वेस्थानकावर अटक केली. धावत्या रेल्वेतून उतरून पसार होण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला पकडले. संशयिताने अन्य अनेक नागरिकांचीही फसवणूक केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून दोघांची १ कोटी २३ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फेब्रुवारी २०२५ मध्ये रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. मुख्य संशयित दीपेश रूपानी दीड वर्षापासून फरार होता. पोलिसांनी जोधपूर, अमरावती, खामगाव, बडनेरा येथे त्याचा शोध घेतला. तो ठिकाणे व मोबाईल क्रमांक बदलत होता. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने टक्कल करून पेहरावही बदलला. अखेर एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याचे विविध पेहरावांतील छायाचित्रे तयार करून पोलिसांनी त्याला शोधून काढले.
तांत्रिक पाठलाग
पोलिस पथकाची दिशाभूल करण्यासाठी त्याने स्वतःचे वेशांतर केले, पेहराव बदलला, वारंवार मोबाईल नंबर व दुसऱ्याच्या नावाचे सीमकार्ड वापरण्यास सुरवात केली. मात्र, आर्थिक गुन्हेशाखेने चिकाटीने तपास सुरू ठेवत संशयिताचा तांत्रिक पाठलाग सुरूच ठेवला होता.
धावत्य रेल्वेतून घेतली उडी
दिपेश रुपानी हा मुंबई ते नागपूर दुरांतो एक्स्प्रेसने प्रवास करत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली. त्यांच्यासह सहायक निरीक्षक ईश्वर पाटील, सहाय्यक फौजदार विजय निकुंभ, प्रीतमकुमार पाटील, समाधान पाटील, घनश्याम पवार, विजय शिरसाठ हे भुसावळ स्थानकावरून दुरांतो एक्सप्रेसमध्ये चढले. त्यांनी धावत्या रेल्वेत दिपेशचा शोध घेतला. त्या वेळी बडनेरा रेल्वेस्थानकावर रेल्वेचा वेग कमी होताच त्याने एक्स्प्रेसमधून उडी घेत पळ काढला. मात्र, पोलिसांनी झडप घालून रुपानी यास ताब्यात घेतले.
चौकट
पोलिसांकडून आवाहन
दरम्यान, कंपनीच्या नावाने फसवणूक करण्याचे आमिष दाखवून जर इतरही कोणाची फसवणूक झाली असेल, तर अशा फसवणूक झालेल्या नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.