ॲंकर
शहर टुडे पान चारसाठी
---------------------
(दोन ते तीन कॉलम फोटोे येणार आहे)
जळगाव :
--------------------------
जुन्यासह चिमुकल्या राम मंदिरातही ‘दीपोत्सव’
------------
श्रीरामाच्या चरणी दीपमाळांनी उजळला परिसर; भक्तिमय वातावरणात दिवाळीचा उत्साह
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.८ : दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा, निराशेवर आशेचा व असत्यावर सत्याचा विजय. प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येत आगमनाच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या दीपोत्सवाचा उत्साह जळगाव शहरातील जुन्या श्रीराम मंदिरासह चिमुकल्या श्रीराम मंदिरांतही रविवारी (ता.८) पाहायला मिळाला. मंदिर परिसरात लावलेल्या पणत्या, विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीमुळे दोन्ही मंदिरांचा परिसर प्रकाशाने उजळून निघाला होता. भाविकांच्या उपस्थितीत धार्मीक वातावरणात दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.''
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मंदिरांची स्वच्छता करून आकर्षक सजावट करण्यात आलेली दिसून येत होती. मंदिराच्या प्रवेशद्वारापासून ते गाभाऱ्यापर्यंत दीपांची आरास करण्यात आलेली होती. सायंकाळ होताच पणत्यांच्या प्रकाशाने मंदिर परिसर उजळून निघाला होता. प्रभू श्रीराम, सीतामाता व लक्ष्मण यांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. अनेक भाविकांनी मंदिरात दर्शन घेऊन सुख, समृद्धी व कुटुंबाच्या मंगलमय भविष्यासाठी प्रार्थना केली.
बालकांसह ज्येष्ठांचाही सहभाग
जुन्या राम मंदिराला ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असून, अनेक पिढ्यांपासून भाविकांची या मंदिराशी श्रद्धेची नाळ जोडलेली आहे. दिवाळीच्या निमित्ताने मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा समावेश होता. कुटुंबासह मंदिरात येऊन दीप प्रज्वलित करण्याची परंपरा अनेकांनी जपली.
दुसरीकडे चिमुकल्या श्रीराम मंदिरातही दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहत होता. छोटेखानी पण आकर्षक सजावट, दीपमाळा व रोषणाईने मंदिर परिसराचे रूप पालटले होते. लहान मुलांसह नागरिकांनी येथे येऊन दिवाळीचा आनंद घेतला. मंदिरातील प्रसन्न वातावरणामुळे परिसरात भक्ती व आनंदाची अनुभूती निर्माण झाली.
----
सामाजिक एकोप्याचे दर्शन
दिवाळीच्या या उत्सवातून केवळ रोषणाईचा आनंद नव्हे, तर श्रद्धा, परंपरा व सामाजिक एकोपा यांचे दर्शन घडले. आधुनिक काळात उत्सव साजरे करण्याच्या पद्धती बदलत असल्या, तरी मंदिरांमध्ये जाऊन दीप प्रज्वलित करणे, देवदर्शन घेणे व कुटुंबासह आनंद वाटून घेणे या परंपरा आजही कायम आहेत. जुन्या राम मंदिरासह चिमुकल्या राम मंदिरात उजळलेल्या पणत्यांनी जळगावकरांच्या दिवाळी उत्सवात भक्तीचा व संस्कृतीचा अनोखा रंग भरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.