NMC
NMC esakal
नाशिक

Nashik NMC News : पाणीपट्टी वसुलीत सव्वा कोटीची तूट! घरपट्टीच्या बाबतीत महापालिकेला दिलासा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आर्थिक वर्ष पूर्ण होत असताना घरपट्टीच्या बाबतीत महापालिकेला दिलासा मिळाला आहे. सुधारित उद्दिष्टांपेक्षा अधिक वसुली झाली आहे. त्यामुळे कर सवलत वाढविली जाणार आहे. तर पाणीपट्टीच्या बाबतीत मात्र कच खावी लागली.

जवळपास सव्वा कोटी रुपये वसुलीत तूट दिसून आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत एक कोटी २९ लाख ९४ हजार ५३२ रुपये कमी प्राप्त झाले. (Deficit of half crore in water tax collection Relief to NMC in matter of house lease Nashik News)

२०२२-२३ या आर्थिक वर्षांकरिता घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट १५० कोटी, तर पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट साठ कोटी रुपये निश्चित करण्यात आले होते. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी हवा असेल तर घरपट्टी व पाणीपट्टीत २५ टक्के वाढ करण्याच्या राज्य शासनाकडून सूचना होत्या.

त्यामुळे सुधारित अंदाजपत्रकामध्ये घरपट्टीसाठी १८५, तर पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ७५ कोटी रुपयांचे निश्चित करण्यात आले. वसुलीसाठी मोठ्या रकमेच्या थकबाकीदारांची यादी तयार करून ७५ हजार थकबाकीदारांना सूचनापत्रे पाठविण्यात आली.

थकबाकीदारांच्या दारासमोर ढोल वाजविण्यात आला. त्यामुळे घरपट्टीतून १८६ कोटी रुपये महसुल प्राप्त झाला. मागील वर्षी १३९ कोटी रुपये वसुली झाली होती. यंद्याच्या वसुलीत ४८ कोटी रुपयांनी वाढ झाली. दरम्यान, पाणीपट्टी वसुली मात्र संथगतीने सुरू आहे. पाणीपट्टी वसुलीचे ७५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. आत्तापर्यंत ६३ कोटी रुपये वसुली झाली.

अशी आहे घरपट्टी वसुली (रुपयात)

- सातपूर विभाग- २१ कोटी २५ लाख १७ हजार ९५४

- पश्चिम विभाग- ३१ कोटी ७५ लाख ७३ हजार २५

- पूर्व विभाग- ३० कोटी ४४ लाख तीन हजार ३७९

- पंचवटी विभाग- ३५ कोटी १६ लाख ७३ हजार ६१३

- सिडको विभाग- ४० कोटी ५८ लाख ७० हजार ७६४

- नाशिक रोड विभाग- २७ कोटी ३२ लाख २७ हजार ९९५

--------------------------------------------------------

एकूण वसुली- १८६ कोटी ५२ लाख ६६ हजार ७३०

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

अशी आहे पाणीपट्टी वसुली (रुपयात)

- सातपूर विभाग- आठ कोटी ६८ लाख ४८ हजार २१

- पंचवटी विभाग- ११ कोटी १९ लाख ६५ हजार ८०२

- सिडको- १३ कोटी ७१ लाख १९ हजार ३६९

- नाशिक रोड- बारा कोटी २९ लाख २० हजार ४९७

- नाशिक पश्चिम- सात कोटी २५ लाख ८५ हजार ११७

- नाशिक पूर्व- दहा कोटी ४६ लाख ८२ हजार ५१ रुपये

--------------------------------------------------

एकूण वसुली ६३ कोटी ६१ लाख २० हजार ८५७ रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Boiler blast in Sonipat: डोंबिवलीतील घटना ताजी असताना आणखी एका कारखान्यात बॉयलरचा स्फोट; ४० कामगार होरपळले, 8 जण गंभीर

Gautam Gambhir : गंभीरने सहा महिन्यांपूर्वी केलेल्या 'त्या' मेसेजबद्दल KKR च्या नितीश राणाचा खुलासा; काय लिहिलेलं त्यात?

Latest Marathi Live News Update : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकरला भाविकांसह पर्यटकांची तुफान गर्दी

Nashik Crime News : माजी महापौर अब्दुल मलिक गोळीबार प्रकरणी दोघांना अटक; हल्ला व्यावसायिक वादातून

Porsche Accident : 'ससून'च्या चौकशी समितीला बिर्याणीची मेजवाणी; पुण्यातल्या 'या' प्रसिद्ध हॉटेलातून आलं पार्सल

SCROLL FOR NEXT