Sanjivani jadhav and komal jagdale 
नाशिक

दिल्‍ली अर्ध मॅरेथॉनमध्ये नाशिकच्‍या धावपटूंची छाप; संजीवनी दुसरी तर कोमलने पटकावले तिसरे स्‍थान

अरुण मलाणी

नाशिक : दिल्‍ली येथे रविवारी (ता.२९) झालेल्‍या एअरटेल दिल्‍ली मॅरेथॉन स्‍पर्धेत नाशिकच्‍या धावपटूंनी चमकदार कामगिरी करतांना यशाची परंपरा कायम राखली आहे. अर्ध मॅरेथॉन गटातून भारतीय महिला गटातून नाशिकच्‍या संजीवनी जाधव हिने दुसरा तर कोमल जगदाळे हिने तिसरे स्‍थान पटकावले आहे. भारतीय पुरूषांच्‍या गटात दिनेश कुमार व किसन तडवी चमकले. 

दिल्‍लीला होणार्या या मॅरेथॉन स्‍पर्धेत दरवर्षी नाशिकच्‍या धावपटूंचा सहभाग असतो. यापूर्वी या स्‍पर्धांमध्ये नाशिकच्‍या धावपटूंनी विजेतेपदापर्यंत मजल मारली आहे. दरवर्षी स्‍पर्धेत नाशिकच्‍या धावपटूंकडून स्‍पर्धेत अव्वल कामगिरी केली जात असते. यंदाच्‍या वर्षी कोरोनाच्‍या पार्श्वभुमिवर सुरक्षिततेच्‍या विविध उपाययोजनांसह ही स्‍पर्धा पार पडली. यावर्षीच्‍या स्‍पर्धेत नाशिकच्‍या एकलव्‍य ॲथलेटिक्‍स ॲण्ड स्‍पोर्टस्‌ इन्‍स्‍टिट्यूट व महिंद्रा ॲण्ड महिंद्रा प्रायोजित सात धावपटूंनी सहभाग नोंदविला होता. 

या स्‍पर्धेत अर्धमॅरेथॉन भारतीय महिला गटातून नाशिकच्‍या संजीवनी जाधव हिने सहभागी होत दुसरा क्रमांक पटकावला. २१ किलोमीटर अंतराची ही स्‍पर्धा पूर्ण करण्यासाठी तिने १ तास १३ मिनीटे वेळ घेतला. तिच्‍यापाठोपाठ नाशिकच्‍याच कोमल जगदाळे हिने तिसरे स्‍थान राखले. कोमलने ही स्‍पर्धा १ तास १४.०४ मिनीटांत पूर्ण केली. या गटातून पारूल चौधरी हिने १ तास १२.१८ मिनीटे अशी वेळ नोंदवत अव्वल स्‍थान राखले. 

पुरूषांमध्ये दिनेश, किसन चमकले 

भारतीय पुरूष गटातून सहभागी झालेल्‍या दिनेश कुमारने सातवे स्‍थान राखले. त्‍यासाठी त्‍याने १ तास ५.४४ मिनीटे अशी वेळ नोंदविली. तर त्‍याच्‍यापाठोपाठ किसन तडवी याने १ तास ७.१५ मिनीटे वेळ नोंदवितांना नवव्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या गटातून अविनाश साबळे याने १ तास ००.३० मिनीटे वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला. तर श्रीनु बुगाथा याने १ तास ०४.१६ मिनीटांची नोंदवत दुसरा तर दुगा बुधा याने १ तास ०४.१९ मिनीटे वेळ नोंदवत तिसरा क्रमांक पटकावला. या धावपटूंसोबत "साई'चे प्रशिक्षक विजेंद्र सिंग दिल्‍ली येथे उपस्‍थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT