नाशिक

धुळे व दिल्ली आंदोलन

CD
दिल्लीच्या आंदोलनात सहभागी होऊ! --- सत्यशोधक जनआंदोलनाची भूमिका; सदस्य धुळ्यातून रवाना सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ९ ः नवी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीतर्फे शनिवारी (ता. १०) आंदोलन होणार आहे. त्यात सहभागासह लोकशाहीच्या बचाव आणि संरक्षणार्थ समर्थनासाठी येथील सत्यशोधक जनआंदोलन, सत्यशोधक विद्यार्थी जनआंदोलनचे ४० सदस्य दिल्लीकडे रवाना झाले आहेत. दिल्लीतील आंदोलन चिरडण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक वाहतूक सेवा बंद करून लोकशाहीचा पोरखेळ चालविला आहे. त्याचा तीव्र निषेध करून अशाप्रकारे जनतेला वेठीस धरणाऱ्या आणि चुकीच्या बाबींना पाठबळ, अभय देणाऱ्या केंद्र सरकारला जागरूक नागरिक, विद्यार्थी नमविल्याशिवाय राहणार नाही, असे सत्यशोधक जनआंदोलनाचे प्रवर्तक सिध्दार्थ जगदेव यांनी सांगितले. दिल्ली पोलिसांनी सुरक्षेचे कारण देत या आंदोलनाला अधिकृत परवानगी नाकारली आहे. आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीकडे निघालेल्या विविध राज्यांतील शेकडो कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि पोलिसांकडून विविध पावले उचलली जात आहेत. यात दिल्लीत कॅब, बस, विविध राज्यांत मेट्रो, रेल्वे सेवेवरील परिणाम समोर येऊ लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर श्री. जगदेव म्हणाले, की आंदोलनाच्या समर्थनार्थ विविध राज्यातून येणाऱ्यांना नवी दिल्लीच्या सीमेवरच रोखण्याचे पोलिसांनी नियोजन केले आहे. केंद्र सरकार घाबरलेले दिसते. न्यायहक्क आणि संघर्षशील विद्यार्थी, नागरिक, ‘सीजेपी’च्या कार्यकर्त्यांना सामोरे जाण्याऐवजी त्यांचा आवाज दाबण्यासाठी, लोकशाहीचा बिमोड करण्यासाठी केंद्र सरकार पोलिसांच्या मदतीने काय- काय निर्णय घेत आहे, हे सर्व जग पाहात आहे. पंतप्रधान असताना (स्व.) इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली असताना, त्यांनाही विरोध दर्शविला होता. मात्र, गांधी यांनी लोकशाहीची थट्टा केली नव्हती. मात्र, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेण्याऐवजी केंद्र सरकार त्यांच्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी, लोकशाहीचा बिमोड करण्यासाठी सरसावल्याचे चित्र देशासाठी घातक ठरणारे आहे. अशा भूमिकेचा सत्यशोधक जनआंदोलनाव्दारे तीव्र निषेध करून सहकारी दत्ता थोरात, हर्ष मोरे, प्रवीण पानपाटील, राज वाघ यांच्यासह ४० सदस्य दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ रवाना होत असल्याचे श्री. जगदेव यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd T20I: वेस्ट इंडिजला आली लहर, केला कहर! भारताचे २५० धावांचे विक्रमी लक्ष्य सहज पार केले, शे होपचे नाबाद शतक

Beed News : विद्यार्थी खरेदी-विक्रीतून बोगस संचमान्येचा महाघोटाळा; चंपावती विद्यालयात आढळले उत्तराखंडचे ३ बोगस विद्यार्थी

Ganja Farm Seized : गाढेजळगाव शिवारात गांजाची शेती उघड; ४३० झाडे जप्त, १८ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल, शेतकरी आरोपीला अटक

IND vs WI 2nd T20I: W,W,W! ज्याने आस दाखवली, त्यानेच माती खाल्ली; Mayank Yadav च्या चूकीने मॅच गेल्यात जमा, नेमकं काय घडलं?

Delhi Protest: 30 हजार जवान तैनात अन् 200 जण ताब्यात; CJPच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत काय-काय घडतंय?

SCROLL FOR NEXT