नाशिक

कृषि पंप व कृषीसाहित्य चोरांवर कठोर कारवाई होणे आवश्यक - निलेश चव्हाण

CD
फोटो ओळी 11145 नांदगाव ः तहसीलदार सुनील सैंदाणे यांना निवेदन देताना नीलेश चव्हाण आदी. कृषी साहित्य चोरणाऱ्यांवर कारवाईची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) तहसीलदारांना निवेदन नांदगाव, ता. ८ ः तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आधीच संकटात असताना कृषिपंप, केबल, स्टार्टर व अन्य कृषी साहित्य चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. चोरीच्या घटनांना पोलिसांनी आळा घालावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष नीलेश चव्हाण यांनी केली. चोरीच्या घटनांमध्ये वाढ आणि पोलिसांची उदासीनता यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यास संशयितांना ताब्यात घेण्यात पोलिसांना मर्यादा येतात आणि शेतकऱ्यांना मुद्देमाल ताब्यात घेण्यासाठी अडचणी आणि पोलिस ठाण्याच्या चकरा वाढतात, मुद्देमाल सुपूर्द करतांना जुन्या खरेदी पावतीचा आग्रह न धरता इतर परिस्थितीजन्य पुरावे विचारात घेऊन शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशीही मागणी करण्यात आली. शेतशिवारात रात्रीची गस्त वाढवावी. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न लक्षात घेऊन तातडीने विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक, पोलिस अधीक्षक यांना देण्यात आल्या आहेत. ..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आठवणीतील भेट : पेट्रोल पंपावरचा तो मुलगा नानांना पाहतच बसला...

Nana Patekar Passes Away : "पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती..."; वयाच्या १३ व्या वर्षी सुरू झालेली नाना पाटेकरांची 'दोन गुरूं'ची भावुक आत्मकहाणी

Nana Patekar :अंगावर काटा आणणारा संघर्ष ! नानांचा संपूर्ण जीवनप्रवास !

SA vs AUS Schedule: ८ वर्षांनंतर जुने हिशोब चुकते होणार?'सँडपेपरगेट' राड्यानंतर पुन्हा ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेत खेळणार

Latest Marathi News Live Update: नाना पाटेकरांच्या चाहत्यांची अंत्यसंस्कारासाठी गर्दी

SCROLL FOR NEXT