Covishield News esakal
नाशिक

Covishield Demand : कोरोना पार्श्वभूमीवर 10 हजार कोव्हीशिल्डची मागणी; आरोग्य उपसंचालकांना NMCचे पत्र

सकाळ वृत्तसेवा

Covishield Demand : कोविडचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोविड लसीकरणाचा दुसरा डोस घेण्यासाठी गर्दी वाढत आहे.

परंतु लस उपलब्ध नसल्याने महापालिकेने दहा हजार कोव्हीशिल्डची मागणी आरोग्य उपसंचालकांकडे नोंदविली आहे. (Demand for 10 thousand covishield in background of Corona NMC letter to Deputy Director of Health nashik news)

२०२० ते २२ या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये महापालिका क्षेत्रातील २ लाख ७६ हजार ३६८ लोकांना कोरोना संसर्ग झाला, त्यातील ४१०९ जणांचे मृत्यू झाले. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढतं आहे.

त्याअनुषंगाने राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून सावधानतेच्या सूचना दिल्या आहे. आतापर्यंत कोविड गेल्यात जमा झाल्याचे गृहीत धरून नागरिकांनी दुसरा डोस घेणेदेखील बंद केले. परंतु, रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने बूस्टर डोस घेण्याकडे कल वाढला आहे.

परंतु महापालिकेकडे लसीचा साठा नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे आरोग्य उपसंचालकांशी पत्रव्यवहार करून तातडीने दहा हजार लस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी महापालिकेकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

महापालिकेने लसीकरणासाठी ३४ लसीकरण केंद्रे सुरू केली होती. सर्व केंद्राकडील लसीचा साठा संपुष्टात आला आहे. दरम्यान बूस्टर घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण प्रमाण अवघे १२ टक्के असल्याचे समोर आले आहे.

१५ लाख १२ हजार ५३३ नागरिकांपैकी १४ लाख १३ हजार ५४१ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. हे प्रमाण ९३. ४६ टक्के आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT