धुळे ः टुडे १ साठी, मेन...........ही बातमी आता मिळाल्याने मेनसाठी दिली आहे...
--
फोटो क्रमांक ः 31570
पिंप्री : नरडाणा- बोरविहीर रेल्वे मार्गावर उभारण्यात आलेल्या धोकादायक उड्डाणपुलाच्या ठिकाणी संघटीतपणे निषेध नोंदविताना शेतकरी संघर्ष समितीचे सदस्य.
--
फोटो क्रमांक ः 31571
पिंप्री : पूल पाडण्याचे सुरू असलेले काम.
--
चक्क ‘त्रुटीपूर्ण’ उड्डाणपूल पाडण्यास सुरुवात!
-
नरडाणा- बोरविहीर रेल्वेमार्गाची स्थिती; ५०-६० लाख रूपयांचा अक्षरशः चुराडा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ६ : नरडाणा- बोरविहीर रेल्वे मार्गाच्या उभारणीदरम्यान पिंप्री (ता. धुळे) शिवारातील वडजाई रोडवर बांधण्यात आलेला एक नवनिर्मित उड्डाणपूल पाडण्याची नामुष्की रेल्वे प्रशासनावर ओढवली आहे. तांत्रिक त्रुटी आणि चुकीच्या नियोजनामुळे बांधलेला हा पूल रहदारीसाठी धोकादायक ठरला असता, ज्यामुळे स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध दर्शविला होता. या विरोधामुळे प्रशासनाला अखेर हा पूल जमीनदोस्त करावा लागला असून, या चुकीच्या नियोजनामुळे ५० ते ६० लाख रुपयांचा जनतेचा पैसा पाण्यात गेला आहे. या आर्थिक नुकसानीची आणि प्रशासकीय बेजबाबदारीची जबाबदारी कोणाची, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
-
नेमके प्रकरण काय?
नरडाणा- बोरविहीर नवीन रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. याच मार्गावर पिंपरी शिवारातील वडजाई रोडवर रेल्वे प्रशासनाने एक उड्डाणपूल उभारला होता. मात्र, पुलाचे काम पूर्ण झाल्यावर लक्षात आले की, त्याच्या रचनेमुळे मूळ रस्त्याची दिशा पूर्णपणे बदलून तिथे एक धोकादायक आणि तीव्र वळण (नागमोळी वळण) तयार होत होते. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास भविष्यात येथे भीषण अपघात होऊन निष्पाप लोकांचे जीव जाण्याची दाट शक्यता होती. तसेच, पिंपरी, वडजाई, बाबुळवाडी आणि सौंदाणे येथील शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना धुळे शहरात ये-जा करण्यासाठी कायमस्वरूपी अडचण निर्माण झाली असती. या पुलाच्या चुकीच्या डिझाइनमुळे लोकांचा दैनंदिन प्रवास कठीण आणि जीवघेणा ठरला असता.
-
प्रशासनाची माघार
या धोकादायक पुलाला स्थानिक ग्रामस्थांनी सुरुवातीपासूनच कडाडून विरोध केला. संबंधित पुलाचे काम पूर्ण झाल्यास होणाऱ्या भीषण परिणामांची जाणीव करून देत, ग्रामस्थांनी काम बंद पाडले. यानंतर, नरडाणा- बोरविहीर रेल्वेमार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीने पुढाकार घेतला. समितीच्या शिष्टमंडळाने या संदर्भात १ ऑक्टोबर २०२५ ला सक्षम प्राधिकारी तथा प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन आक्षेप नोंदविला. या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत सक्षम प्राधिकारी रोहन कुवर यांनी रेल्वे प्रशासनाला पत्रव्यवहार केला आणि ग्रामस्थांच्या मागणीनुसार योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना दिली. जनमताचा वाढता रेटा आणि सक्षम अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर रेल्वे प्रशासनाने आपली चूक मान्य करत हा त्रुटीपूर्ण पूल पाडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, आता हा पूल पाडण्याचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती आंदोलक जयेश चौधरी, भूषण देवरे, अभिजीत देवरे, तुषार देवरे, भूषण चौधरी आदींनी दिली. आता या ठिकाणी रहदारीस कोणताही अडथळा होणार नाही, अशा सुरक्षित रचनेचा नवीन पूल उभारण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
१४-१
...चौकट...
१४-१
पाच प्रश्न अनुत्तरित
पूल पाडण्याच्या कारवाईमुळे ५० ते ६० लाख रुपये किमतीचे सरकारी काम फुकट गेले असून, ही रक्कम थेट करदात्यांच्या खिशातून गेली आहे. याप्रकरणी अनुत्तरित प्रश्न असे : सुरुवातीला पुलाचे डिझाइन करताना तांत्रिक बाबींचा विचार का केला गेला नाही?, लाखो रुपये खर्चून पूल उभारताना संबंधित इंजिनिअर्स आणि ठेकेदारांनी स्थानिक परिस्थितीची पाहणी केली नव्हती का?, या सरकारी पैशाच्या अपव्ययासाठी दोषी कोण? संबंधित अधिकारी वा ठेकेदारावर कोणती कारवाई होणार? आता नवीन पूल उभारताना स्थानिकांच्या सोयीचा आणि सुरक्षिततेचा विचार केला जाईल का?, पुन्हा हाच प्रकार घडू नये, यासाठी प्रशासन काय पावले उचलणार आहे?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.