dengue esakal
नाशिक

नाशिकमध्ये डेंग्यू, चिकनगुनियाचे थैमान; शहरात डेंगीचे ९२० रुग्ण

विक्रांत मते

नाशिक : शहरात डेंगीच्या रुग्णांची संख्या ९२० पर्यंत पोहोचली असून खासगी रुग्णालयांमधील वाढती रुग्ण संख्यालक्षात घेता एक हजारांचा टप्पा ऑक्टोंबर अखेर पर्यंत गाठण्याची दाट शक्यता आहे. चिकनगुनियाने देखील मागील पाच वर्षांचे विक्रम मोडीत काढताना साडे सहाशे रुग्ण संख्या गाठली आहे. दरम्यान वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर पाच हजार ८१८ घरांमध्ये डेंगी डासांची उत्पत्ती साधने आढळून आली आहेत.

शहरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी सुरु असली तरी दुसरीकडे डेंगी व चिकनगुणियाने तोंड वर काढले आहे. एक जानेवारी ते १४ ऑक्टोबर या कालावधी पर्यंत डेंगी सदृश्‍य आजाराचे ४,९२२ रुग्ण आढळले. रक्त तपासणीनंतर २० जणांना डेंगी झाल्याचे निष्पन्न झाले. दोन हजार ३८८ रक्त नमुन्यांची तपासणीनंतर ६५१ कनगुनियाचे रुग्ण आढळून आले. दरम्यान डेंगी व चिकनगुनिया रुग्णांची संख्या वाढूनही शहरात नियमित फवारणी होत नसल्याची बाब समोर येत आहे. डास निर्मूलनाच्या ठेक्यावरून सलेल्या न्यायालयात वाद सुरु आहे. मागील साडे नऊ महिन्यात १८ हजार ६३६ किलोमीटर भागात जंतूनाशक फवारणी करण्यात आली आहे. दोन लाख ५४ हजार ६४७ घरांमध्ये धुर फवारणी करण्यात आल्याचा दावा मलेरिया विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. दरम्यान घराच्या परिसरात, छतावर, निकामी टायर्स, फुलदाण्यांमध्ये साचलेल्या स्वच्छ पाण्यातही डासांची उत्पत्ती होत असल्याने नागरिकांना तो भाग स्वच्छ करण्याचेआवाहन महापालिकेच्या मलेरिया विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

घरात आढळतायत डेंगीच्या अळ्या

मलेरिया विभागाच्या वतीने घरांमध्ये तपासणी करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार तीन लाख २४ हजार २६३ घरांची तपासणी करण्यात आली. त्यात पाच हजार ८१८ घरांमध्ये डेंगी उत्पत्तीची स्थाने आढळली. डास उत्पत्तीला कारणीभुत ८८० नागरिकांना नोटीसा बजावण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT