dengue-fever-1564558571.jpg
dengue-fever-1564558571.jpg 
नाशिक

डेंगीची रुग्णसंख्या ८५ टक्क्यांनी घटली; मलेरिया, स्वाइन फ्लूसुद्धा नियंत्रणात

विक्रांत मते

नाशिक : कोरोनाने संपूर्ण शहराला कवेत घेतले असताना डेंगी, मलेरिया व कॉलरा हे आजार नियंत्रणात असल्याची बाब महापालिकेच्या अहवालातून समोर आली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबरमध्ये डेंगीचे एक हजार १२४ रुग्ण आढळले होते. यंदा मात्र रुग्णसंख्या ८५ टक्क्यांनी घटली असून, दहा महिन्यांत १७६ जणांना डेंगीची लागण झाली आहे. 

मलेरिया, स्वाइन फ्लूसुद्धा नियंत्रणात 

पावसाळ्यात डेंगीचा प्रादुर्भाव वाढतो. मागील वर्षात शहरात डेंगीचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले होते. डेंगीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात चर्चेचा विषय ठरला होता. त्याअनुषंगाने राज्य शासनाने महापालिकेला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. १ जानेवारी ते २३ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत शहरात डेंगीचे एक हजार १२४ रुग्ण आढळल्याने भीती निर्माण झाली होती. यंदा सर्वच स्तरावर कोरोना हा एकमेव विषय राहिला. त्यामुळे आरोग्याबाबत नागरिक सजग झाले होते. कोरोनाशी लढा देत असताना इतर आजार होणार नाही, याची दक्षता नागरिकांनी घेतल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम डेंगीला तोंड वर काढता आले नाही. 

आकडेवारी बोलते... 

गेल्या वर्षी जुलैत ४८, ऑगस्टमध्ये ११७, सप्टेंबरमध्ये १६५, तर ऑक्टोबरमध्ये २०७ जणांना डेंगीची लागण झाली होती. या वर्षी आजारात कमालीची घट झाली आहे. या वर्षी जुलैत १४, ऑगस्ट २८, सप्टेंबर ३९, तर २३ ऑक्टोबरपर्यंत डेंगीचे २२ रुग्ण आढळले. गेल्या वर्षी स्वाइन फ्लूचे १७८ रुग्ण आढळले होते. या वर्षी अवघे सहा रुग्ण आढळले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT