नाशिक

पाऊस कमी, तरी डेंग्यूचा डंख कायम

CD
टुडे एक : --- (डेंगीचा डास व बाधित रुग्णाचे छायाचित्र वापरावे) --- पाऊस कमी, तरी ‘डेंगी’चा डंख कायम (उपशीर्षक) सप्टेंबरमध्ये ७५३ संशयितांची तपासणी; २७ जणांचे अहवाल ‘पॉझिटिव्ह’ सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ४ : यंदा पावसाचे प्रमाण सर्वत्र कमी असतानाही डेंगीचा फैलाव कायम असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर येत आहे. आरोग्‍य विभागाकडून गेल्‍या महिन्‍यात ७५३ संशयितांची तपासणी झाली असून, त्यापैकी २७ रुग्ण डेंगी पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर सप्‍टेंबरअखेरपर्यंत १४० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर संशयित रूग्‍णांमधील अनेकांचे अहवाल समोर येत नसल्‍याने आकडा कमी असून प्रत्‍यक्ष आकडेवारीपेक्षा डेंगी पॉझिटिव्‍ही असलेल्‍या रुग्‍णांची संख्‍या अधिक असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. प्रामुख्‍याने पावसाळ्याच्‍या दिवसात पावसाच्‍या पाण्याचे डबके साचून त्‍यात डासांचा उत्‍पत्ती होऊन साथरोग मोठ्या प्रमाणात पसरत असतात. ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक असते. दरम्‍यान, गेल्‍या काही दिवसांपासून संपूर्ण जिल्‍ह्यात व्‍हायरल इन्‍फेक्‍शन होण्याचे प्रमाण वाढलेले आहेत. ताप, अंगदुखी, सर्दी यासारख्‍या आजाराचे रूग्‍ण अधिक आहेत. यात डेंगीसदृश आजाराचे लक्षण असलेल्‍यांची संख्‍या देखील अधिक आहे. यामुळे मागील दोन– तीन महिन्‍यांपासून डेंगी रूग्‍ण आढळून येत आहेत. चाळीसगावात सर्वाधिक ‘पॉझिटिव्ह’ जिल्‍हा परिषदेच्‍या आरोग्‍य विभागाकडून दर महिन्‍याला तपासणी केली जाते. जानेवारी ते सप्‍टेंबर अखेरपर्यंत जिल्‍ह्यातील चाळीसगाव तालुक्‍यात आतापर्यंत सर्वाधिक २६ तर सप्‍टेबर महिन्‍यात ४ डेंगी पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. येथे ७३४ संशयितांची तपासणी करण्यात आली. त्यापाठोपाठ भुसावळमध्ये सप्‍टेंबरअखेरपर्यंत ५१८ संशयितांपैकी १७, अमळनेरमध्ये ६५५ पैकी ९ आणि जामनेरमध्ये ५३८ पैकी ९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. चौकट डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्याची गरज पाऊस नसताना केवळ सांडपाण्यामुळे ग्रामीण भागात अजूनही साथरोग पसरत आहेत. चाळीसगाव, भुसावळ, अमळनेर आणि जामनेर या भागांत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तुलनेने अधिक असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. त्यामुळे डेंगीचा फैलाव रोखण्यासाठी घराभोवती किंवा परिसरात पाणी साचू न देणे, डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करणे आणि तापाची लक्षणे आढळल्यास वेळेत वैद्यकीय तपासणी करून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. ––––– ग्राफ ‘डेंगी’ची ३० सप्टेंबरअखेरची स्थिती संशयित रुग्णांची तपासणी : ६,३०९ पॉझिटिव्ह रुग्ण : १४० सप्टेंबरमधील संशयित : ७५३ सप्टेंबरमधील पॉझिटिव्ह : २७ ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह : ११८ नगरपालिका क्षेत्रातील पॉझिटिव्ह : २२ ––––

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

Latest Marathi News Live Update : मालेगाव मध्ये तापमान 38.2 अंशावर पोहचले

SCROLL FOR NEXT