The bus stand that is free after stopping illegal vehicle parking at the bus stand in Deola. esakal
नाशिक

Nashik News: देवळा बस स्थानकाने घेतला मोकळा श्वास; परिवहन मंडळाने हटविली अवैध वाहन पार्किंग

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील बसस्थानकावर होत असलेल्या अवैध वाहन पार्किंगमुळे एसटीला अडथळा होत असल्याने राज्य परिवहन व्यवस्थापनाने बसस्थानकावरील अवैध पार्किंग हटविली. यामुळे बस स्थानकाने मोकळा श्‍वास घेतला.

यासह येथे स्वतंत्र सुरक्षारक्षकाची नेमणूक करत आणि तसा फलक लावत दंडात्मक कारवाई करण्याचे सूचित केल्याने आज रविवार (ता.२८) रोजी आठवडे बाजार असूनही बसस्थानकात कुणीही दुचाकी-चारचाकी वाहन पार्क केले नाही. (Deola bus station Illegal vehicle parking removed by msrtc Board Nashik News)

देवळा येथे नवीन व अद्ययावत बसस्थानकाचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. यामुळे येथे येणाऱ्या प्रवाशांना अनेक सुविधा मिळणार आहे. बसस्थानक येथे अधिकृत पार्किंग नसताना देखील सर्रास नागरिकांकडून चारचाकी, दुचाकी वाहने लावली जात होते.

त्यामुळे येथे अवैध पार्किंगच्या समस्येने उग्र रूप धारण केले होते. शहरात इतर ठिकाणी पार्किंगची सोय नसल्याने आजूबाजूच्या खेडेगावातील आलेले नागरिक येथील बसस्थानकावर वाहनांची पार्किंग करायचे मात्र त्यामुळे एसटी बसेस यांच्या ये-जा करण्यावर मर्यादा पडत असे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यामुळे येथील वाहन पार्किंग हटवावी अशी मागणी छावा जनशक्ती संघटनेने निवेदनाद्वारे केली होती. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. याची तत्काळ दखल घेत येथील परिवहन महामंडळाने बसस्थानकावरील अवैध पार्किंग हटविले.

तसेच दंडात्मक कारवाईचा बोर्ड याठिकाणी लावण्यात आल्याने बसस्थानकात एकही वाहन लागले नाही आणि बसस्थानकाने मोकळा श्‍वास घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT