Deola Nagar Panchayat ranks third in state in cleanliness  esakal
नाशिक

Nashik News : स्वच्छतेत देवळा नगरपंचायत राज्यात तृतीय

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नावीन्यपूर्ण संकल्पना व उल्लेखनीय काम केल्याने शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेत देवळा नगरपंचायतीने राज्यात तृतीय क्रमांक मिळवला. याबद्दल नगरपंचायतीला पाच कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. (Deola Nagar Panchayat ranks third in state in cleanliness nashik news)

गुरुवार (ता.२०) रोजी नगरविकास दिनानिमित्त मुंबईत झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व शिक्षणमंत्री दीपक केसरकर, विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नगरविकास प्रधान सचिव सोनिया शेट्टी आदींच्या प्रमुख उपस्थितीत मुख्याधिकारी श्‍यामकांत जाधव, नगराध्यक्षा सुलभा आहेर व इतरांनी सदर बक्षीसाचा धनादेश व सन्मानपत्र स्वीकारले.

स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शहर सौंदर्यीकरण स्पर्धेत देवळा नगरपंचायतीने भाग घेत गत महिन्यात विभागस्तरावर प्रथम क्रमांक मिळवला होता. ‘स्वच्छ देवळा सुंदर देवळा’ उपक्रमांतर्गत आमदार डॉ.राहुल आहेर, भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या योगदानातून देवळा शहरात विविध उल्लेखनीय कामे झाल्याने त्याचा फायदा या स्पर्धेसाठी झाला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

शिवस्मारक, नदीपात्रातील स्वच्छता, पाणी अडवा- पाणी जिरवा उपक्रम, वारसा हक्क म्हणून पाच कंदीलचे सुशोभीकरण, बाजारतळ आदी बाबींची राज्य सरकारकडून आलेल्या पथकाने पडताळणी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र करत आणि त्यातही तृतीय क्रमांक येत सदर पाच कोटी रुपयांचे बक्षीस देवळा नगरपंचायतीला मिळाले.

पुरस्कार प्रदान समारंभाप्रसंगी कार्यक्रमावेळी उपनगराध्यक्ष अशोक आहेर, माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार, नगरसेवक जितेंद्र आहेर, करण आहेर, मनोज आहेर, भाग्यश्री पवार, रत्ना मेतकर, शीला आहेर, मुख्याधिकारी श्यामकांत जाधव, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सुयोग पाचपाटील, शहर समन्वयक पूनम भामरे, तुषार बोरसे, दीपक सूर्यवंशी हे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT