Bribe crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : चांदवडच्या उपकोषागार अधिकाऱ्यास लाच घेताना अटक

नरेश हाळणोर

नाशिक : थकीत वेतनाचे बिल मंजूर करण्यासाठी कोणताही आक्षेप न घेण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना चांदवडच्या उपकोषागार अधिकाऱ्यास रंगहाथ अटक करण्यात आली. सुनील सुभान तडवी (४९, रा. मर्चण्ट कॉलनी, खंडेराव महाराज मंदिर रोड, चांदवड) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. (Deputy Treasury Officer of Chandwad arrested for accepting bribe Nashik Bribe Crime news)

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, त्यांच्या थकीत वेतनाचे बिल मंजूर करण्यासाठी व त्यावर कोणताही आक्षेप घेऊ नये यासाठी लाचखोर तडवी याने १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती १० हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले होते. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मंगळवारी (ता. १३) सापळा रचण्यात आला होता. त्यानुसार, तक्रारदार यांच्याकडून पंचासमक्ष लाचखोर तडवी याने १० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली.

त्यावेळी दबा धरून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाचखोर तडवी यास रंगेहाथ अटक केली. तडवी हे चांदवड येथील कोषागार कार्यालयामध्ये उपकोषागार अधिकारी या पदावर काम करीत होते. याप्रकरणी चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई लाचलुचप प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गायत्री जाधव-पाटील, प्रकाश महाजन, परशुराम जाधव यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांना देशाबाहेर काढण्याचा निर्णय! घुसखोरांसाठी अमित शाहांचं मोठं पाऊल; उच्चस्तरीय समिती गठीत

धक्कादायक! सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मंत्रालयातच चोरी, मंत्र्याच्या कॅबिनमधून ८० हजार रुपये लंपास...

IPL 2026: हार्दिक पांड्या CSK कडून खेळणार? '०७:०७' पोस्ट अन् Mumbai Indians चा कॅप्टनची चर्चा... नेमकी भानगड काय?

Thane Crime: ‘प्रेम’ बनलं सापळा! १४० हून अधिक तरुणींची फसवणूक; ‘लव्ह स्कॅम’चा मास्टरमाइंड अटकेत

माझ्या नवऱ्यानेदेखील त्या बातम्या वाचल्या... मित्रांसोबत अफेअरच्या चर्चांवर पूजा सावंतने सोडलं मौन; म्हणाली-

SCROLL FOR NEXT