Nashik Municipal Corporation sakal
नाशिक

नशिबाने आले, कर्माने नेले

स्वच्छतेत महापालिकेची घसरगुंडी; पायाभूत प्रकल्पांनी विकासाला दिशा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोनामुळे (Corona )२० महिने स्वच्छतेला वाहण्यात आले. घरापासून ते दारापर्यंत स्वच्छतेला किती महत्त्व आहे, याची जाणीव पावणेदोन वर्षांत झाली. त्यामुळे महापालिकेने (Nashik Municipal Corporation) या विषयाकडे लक्ष केंद्रित केले. मात्र, स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल हाती पडला. त्या वेळी आहे तो क्रमांक टिकविणे तर दूरच उलट सतराव्या क्रमांकापर्यंत घसरगुंडी उडाल्याने स्वच्छतेच्या दाव्याचे तीनतेरा वाजले, ही बाब या वर्षाच्या दृष्टीने महत्त्वाची म्हणता येईल.

महापालिकेच्या कामकाजाचा वर्षभराचा आढावा घेत असताना, स्वच्छतेच्या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वैद्यकीय व स्वच्छता या दोन गोष्टींसाठी कोरोनाकाळात अडीचशे कोटींहून अधिक खर्च झाला असताना, स्वच्छतेच्या क्रमातील घसरगुंडीने अजून मोठी मजल मारावी लागेल, असे संकेत दिले. मात्र, उठसूट महापालिकेच्या नकारात्मक बाबींवर बोलणाऱ्या नागरिकांनीही महापालिकेच्या कामकाजात सहभागी होणे गरजेचे असल्याचे यानिमित्त स्पष्ट झाले.

कोरोनाने बरेच काही शिकविले

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने या वर्षी प्रशासकीय त्रुटींबरोबरच भविष्यात अशा प्रकारची लाट आल्यास काय तयारी करावी लागेल, याची जाणीव करून दिली. एप्रिलमध्ये डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे २४ रुग्णांचा हकनाक बळी गेला. मृत्यूची संख्या वाढत असताना, स्मशानभूमीत मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. हिंदू स्मशानभूमीत लाकडे मिळाली नाहीत. रुग्णवाहिका, रुग्णवाहिकांची तीन ते चार तास वाट पाहावी लागली. मृत्यूचे दाखले मिळण्यात अडचण, लसीकरणाचा बोजवारा, रुग्णांच्या नातेवाइकांचा आर्थिक छळ यासारख्या गोष्टींनी पायाभूत सुविधा किती पाण्यात आहेत, हे दाखवून दिले. महापालिकेच्या २९ कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे प्राण गमवावा लागला. कोरोना कमी की काय डेंगी व चिकनगुनियानेही पाच वर्षांचे रेकॉर्ड मोडले.

वर्षात महत्त्वाचे निर्णय

  • शहर बससेवेला प्रारंभ

  • अधिकारी-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

  • अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती

  • नवीन बिटको रुग्णालयात अत्याधुनिक प्रयोगशाळा

  • बाजार फी वसुलीचे खासगीकरण

  • बौद्धिक व्यवसाय करणाऱ्यांना निवासी दराने घरपट्टी

  • कश्‍यपी प्रकल्पग्रस्त महापालिकेच्या सेवेत कायम

  • स्मार्ट स्कूलला चालना

  • महापालिकेच्या अकरा मिळकतींचा ‘बीओटी’वर विकास

  • परवाना शुक्लात दहापट वाढ

  • पिंपळगाव खांब मलनिस्सारण केंद्र सुरू

  • अंगणवाड्यांना बचतगटामार्फत पोषण आहार

वर्षात चर्चेचे ठरलेले विषय

  • मायको सर्कल व त्रिमूर्ती चौकातील वादग्रस्त उड्डाणपूल

  • घरपट्टी-पाणीपट्टी वसुलीचे खासगीकरण

  • कब्रस्तानसाठी महानुभाव पंथाची जागा दिल्याने हिंदू संघटना आक्रमक

  • घंटागाडी, बीओटी महत्त्वाचे प्रकल्प विनाचर्चा मंजूर

  • महिला स्वयंरोजगार प्रशिक्षणाचा ठेका अखेर वादग्रस्त कंपनीलाच

  • क्रिसिलच्या अहवालात महापालिकेची पत घसरली

  • एलईडी दिवे बसविण्याचे काम अद्यापही अपूर्ण

  • टीडीआर घोटाळा

  • महत्त्वाच्या खाते प्रमुखांच्या बदल्या

  • आउटसोर्सिंगने कर्मचारी भरती

  • अडीचपट दर वाढवून दिला जाणारा घंटागाडी ठेका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat : सरकारच्या कारभारात हस्तक्षेप करत नाही पण मणिपूरमध्ये... सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune News : अजित पवारांचा निर्णय; सहकार संकुलात तीन नवीन मजले, एक मजला केंद्र सरकारसाठी राखीव

बिहार विधानसभेतील पराभवानंतर वाढलं काँग्रेसचं टेन्शन; राज्यसभेच्या जागांवर होणार परिणाम, किती जागांवर फटका बसणार?

Nashik Tourism: अहो, नाशिककर...! ट्रेकिंगला जाण्यासाठी ठिकाण शोधताय? मग पुणे- मुंबईला न जाता 'हरिहर किल्ला' करा एक्सप्लोर

'पाचगणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा अपहरणाचा प्रयत्न'; सातारा जिल्ह्यात खळबळ, साधूच्या वेशात आली टोळी अन्..

SCROLL FOR NEXT