Relatives are happy to meet Badiwan in the prison's meeting program esakal
नाशिक

Nashik: नातेवाइकांच्या भेटीने पाणावले बंदिवानांचे डोळे; भावपूर्ण गळाभेट कार्यक्रमात अधिकारीही भावुक

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातर्फे गळाभेट उपक्रम राबविण्यात आला. नातेवाइकांच्या भेटीने कारागृहातील बदिवानांचे डोळे पाणावले. या वेळी कारागृहातील अधिकारीही काही क्षण भावुक झाले होते.

२०१६ ला कारागृहातील कैद्यांच्या आत्महत्यामध्ये वाढ होत होती. त्यामुळे कारागृह विभागाचे पोलिस महासंचालक भूषण कुमार उपाध्याय यांनी गळाभेट कार्यक्रम पुन्हा राबविण्यास सुरवात केली होती. याचाच एक भाग म्हणून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात हा भावनिक सोहळा पार पडला. (Detained Gets emotional by visit of relatives Officials also emotional in hug event Nashik)

कारागृहातील पुरुष शिक्षा बंदी, महिला शिक्षा बंदी व महिला न्यायधीन बंदी यांची अठरा वर्षाखालील मुले, मुली, नात, नातू व भाऊ-बहीण यांना गळा भेटीत सहभागी होण्याची संधी देण्यात आली.

सकाळपासून कारागृहाबाहेर नातेवाइकांनी गर्दी केली होती. गळा भेटीमुळे बंद्यांना भेटता येणार असल्याने ते आनंदित झाले होते. वातावरण अत्यंत भावुक झाले होते.

अप्पर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता, मध्य विभागाचे कारागृह उपमहानिरिक्षक यु. टी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृह अधिक्षक अरुणा मुगुटराव, उपअधिक्षक सचिन चिकणे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक मलबाड आणि सहका-यांनी हा उपक्रम राबवला.

मुंबई, नाशिक, मराठवाडा आदी भागातून नातेवाईक सकाळपासूनच आले होते. दोनशे बंदिवानांनी गळाभेटीसाठी अर्ज केले होते.

कोरोनानंतर उपक्रम सुरू

कारागृह अधिकारी अशोक मलवाड यांनी सांगितले, की कोरोना संकटामुळे गेली चार वर्षे उपक्रम स्थगित करण्यात आला होता. आता पुन्हा तो जोमाने सुरू केला आहे. अमिताभ गुप्ता यांनी आता दर सहा महिन्यांनी हा उपक्रम सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.

यंदा दोन ते अठरा वर्षापर्यंतच्या मुले, मुली, नात, नातू, बंदिवानांच्या भावाची मुले, पत्नी, आई अशा रक्ताच्या नातेवाइकांना गळा भेटीसाठी परवानगी देण्यात आली.

दरम्यान, गळाभेटीमुळे बंदिवानांच्या पत्नी, मुला, मुलींनीही अश्रूंना वाट मोकळी करून दिली. नातेवाइकांना मिसळ पाव देण्यात आले. तर कारागृहातर्फे बंदिवानांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT