नाशिक

राष्ट्रनिर्माण कार्यात योगदान द्यावे : महाजन

CD
‘विकसित भारत’साठी जनसहभाग वाढवा गिरीश महाजन : भाजपच्या सेवा ज्योती कलश यात्रेतून राष्ट्रनिर्माणाचा संदेश सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत @ २०४७’ संकल्पनेमध्ये प्रत्येक नागरिक व कार्यकर्त्याने सक्रिय सहभाग नोंदवावा. या सहभागातून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. भारतीय जनता पक्षातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत बुधवारी (ता.१७) विकसित भारत संकल्प सभा आणि सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात पार पडली. पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात विकसित भारत संकल्प सभेवेळी मंत्री महाजन यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी महापौर हिमगौरी आडके, पक्षाचे शहराध्यक्ष सुनील केदार, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमाताई हिरे व राहूल ढिकले, माजी आमदार निशिगंधा मोगल, ज्येष्ठ नेते विजय साने, महेश हिरे, सुनील देसाई, मनपा गटनेते श्याम बडोदे आदी उपस्थित होते. मंत्री महाजन म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवा संकल्पातून देशाच्या विकासाला नवी दिशा दिली. भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याचे ध्येय पंतप्रधानांनी देशासमोर ठेवले आहे. सेवा, संघटन व राष्ट्रनिर्माणाच्या भावनेतून भाजप कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचून या संकल्पनेला व्यापक जनसहभाग मिळवून द्यावा, असेही महाजन यांनी सांगितले. सेवा संकल्प अभियानानिमित्ताने समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना यावेळी सन्मानित करण्यात आले. तसेच विकसित भारत रील स्पर्धेतील विजेत्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, मंडल अध्यक्ष, विविध आघाड्या-मोर्चांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सेवा ज्योती कलश यात्रा भाजपतर्फे यावेळी सेवा ज्योती कलश यात्रा काढण्यात आली. या यात्रेतून सेवा, समर्पण आणि राष्ट्र निर्माणाचा संदेश देण्यात आला. यात्रेच्या समारोपप्रसंगी अनंत कान्हेरे मैदान येथे आयोजित रांगोळी प्रदर्शनाला मंत्री महाजन यांनी भेट देत कलाकारांचे कौतुक केले. विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रभक्तीपर विषयांवर साकारलेल्या रांगोळ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. फोटो क्रमांक :- एच-३१५८३, ८४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mithun Chakraborty: ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती पश्चिम बंगाल सरकारचे सल्लागार म्हणून नियुक्त; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा बहाल

Pune News : चारा टंचाईआधीच पशुसंवर्धन विभाग ‘अलर्ट’; पीक अवशेष जाळण्याऐवजी साठवणूक, प्रक्रिया आणि पोषणमूल्यवर्धनावर भर

Ramdas Athawale on Gyanesh Kumar : 'ज्ञानेश कुमार काहीही झाले तरी राजीनामा देणार नाहीत'; अभिजीत दीपकेंच्या आंदोलनावर रामदास आठवले स्पष्टच बोलले, दिला कडक इशारा

Pune News : खेळाच्या मैदानावरील अनधिकृत इमारत महापालिकेच्या बांधकाम विभागाने केली जमीनदोस्त

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक विधान परिषद निवडणुकीसाठी ४८ उमेदवार रिंगणात; ९ ऑक्टोबरला माघारीची अंतिम मुदत

SCROLL FOR NEXT