nashik sakal
नाशिक

नद्यांच्या संवर्धनातून सांस्कृतिक पर्यटन विकास

पोलिस आयुक्त : जागतिक पर्यटन मित्राचा गौरव

, सकाळ वृत्तसेवा

नाशिक: भारतीय संस्कृतीचा उगम हा नद्यांच्या खोऱ्यातून झाला असून, नाशिक जिल्हाही त्याला अपवाद नाही. त्यामुळे नद्याच्या संवर्धनातून पर्यटनाची संवर्धन संकल्पना राबविल्यास सांस्कृतिक आणि पर्यटन विकास ही दोन्ही ध्येय साध्य होतील, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी केले.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त नियोजन सभागृहात पर्यटन परिसंवाद व पर्यटनमित्र पुरस्कार वितरण झाले. त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी प्रशासन भीमराज दराडे, पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक नितिनकुमार मुंडावरे, महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, टॅनचे अध्यक्ष राजेंद्र बकरे यांच्यासह नाशिक पर्यटन विभागातील अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

गोदावरी केंद्रबिंदू असावी

श्री. पांडे म्हणाले, की जागतिक पर्यटन दिन हा पर्यटन या संकल्पनेवर आधारित असतो. पर्यटन केवळ देशाच्या आर्थिक मूल्यांवरच नाही, तर सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक मूल्यांवरही परिणाम करतो. या अनुषंगाने जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची ख्याती सर्वदूर पसरविण्यासाठी नागरिकांचे योगदान ही महत्त्वाचे आहे. नाशिकला धार्म‍िक, सांस्कृतिक व ऐतिहासिक स्थळांचा वारसा लाभला आहे. गोदावरी नदीच्या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या स्थळांचा पर्यटनदृष्ट्या विकास करून प्रचार व प्रसिद्धी करण्यावर पर्यटन विभागाने भर द्यावा, असेही आवाहन त्यांनी केले.

पदाधिकाऱ्यांचा गौरव

पर्यटन उपसंचालक नितीनकुमार मुंडावरे म्हणाले, की कोरोनामुळे पर्यटनाचा विकास मंदावला होता. मात्र, आता नाशिक जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी सर्वोतपरीने प्रयत्न करण्यात येत असून, जिल्ह्यात औद्योगिकदृष्ट्या तसेच ॲग्रो टुरिझम आदींच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येणार आहे. रोहित जाधव, संजय पवार, योगेश चव्हाण, सुजॉय गुप्ता, नीलिमा जोरवर, शामली चौधरी, प्रदीप पाटील, संजय कहांडळ, रघुवेंद्र कुमार, बालाजी वल्लाल, प्रभाकर साळवे, राजेंद्र बकरे आदींचा सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा; २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

Rohit Sharma Dance: रोहितने माहोल बनवला... Treding गाण्यावर डान्सिंग मुव्ह; मित्रालाही शिकवले... Video Viral

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

SCROLL FOR NEXT