PM Modi Devendra Fadnavis esakal
नाशिक

Devendra Fadanvis | मिशन इंडिया हीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोहीम : उपमुख्यमंत्री फडणवीस

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मिशन इंडिया हीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोहीम आहे, त्यासाठीच ते देशभर फिरतात, महाराष्ट्रात दुसऱ्यांदा आल्याने हे ज्यावेळेस येतात, त्या वेळी महाराष्ट्राला काहीतरी देऊन जातात.

त्यामुळे विरोधी पक्षांनी आनंद साजरा करायला हवा, असा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. (Devendra Fadanvis statement about Prime Minister Narendra Modi nashik news)

नाशिकमध्ये प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी फडणवीस नाशिकमध्ये आले. या वेळी माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षाने पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यासंदर्भात केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिले.

महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांना जोडणारी वंदे भारत दोन ट्रेन सुरू झाल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. ज्यांना त्यांच्या राजकीय हयातीत काही जमले नाहीत, ते पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यावर टीका करत असल्याचे ते म्हणाले.

सरकारमंत्री सावेंची पाठराखण

भाजपच्या जिल्हाध्यक्ष यांच्या परवानगीने सहकार विभागात संस्थांची नोंदणी करावी, असे सहकारमंत्री अतुल सावे यांच्या वक्तव्याचे फडणवीस यांनी पाठराखण केली. सहकार विभाग हा कुठल्या एका पक्षाची मतेदारी नाही.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सहकार विभागात पक्षाचे कार्यकर्ते जोडले जात असेल तर त्यात वाईट काही नाही. सहकार विभागात आत्तापर्यंत एकाच पक्षाची मक्तेदारी होती. प्रत्येक पक्षाला त्यांचा पक्ष वाढविण्याचा अधिकार असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत राजकीय प्रस्तावनासह आगामी निवडणुका संदर्भातदेखील चर्चा होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील, हे सांगता येणार नाही. मात्र, राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत त्यावर चर्चा होईल, असे ते म्हणाले

घटना गंभीर, फास्ट ट्रॅकवर चौकशी

रत्नागिरी येथे एका पत्रकाराच्या अपघाती मृत्यू प्रकरणावर बोलताना श्री. फडणवीस म्हणाले, की सदरची घटना गंभीर असून, घातपात झाल्याची तक्रार नातेवाइकांनी केली. या संदर्भात फास्ट ट्रॅकवर सखोल चौकशी करू, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT