Devendra Fadnavis inaugurated Mela bus stand on Saturday nashik news esakal
नाशिक

Nashik News : मेळा बसस्थानकाचे शनिवारी फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मध्य विधानसभा मतदारसंघातील विविध कामांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मध्य विधानसभा मतदारसंघातील विविध कामांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

शनिवारी (ता. १०) सायंकाळी ६ वाजता मेळा बसस्थानक येथे या समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. (Devendra Fadnavis inaugurated Mela bus stand on Saturday nashik news)

जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार उपस्थित राहणार आहे. नव्याने बांधलेल्या मेळा बसस्थानकाचे लोकार्पण होणार आहे.

त्याच पद्धतीने दीपालीनगर येथील राज्यातील सर्वात मोठे दिव्यांग भवन असणाऱ्या अटल स्वाभिमान भवनचेदेखील लोकार्पण करण्यात येणार आहे. नाशिक येथे शिक्षण घेणाऱ्या नर्सिंगच्या मुलींसाठी आरोग्य विभागाकडून बांधण्यात येणाऱ्या नर्सिंग हॉस्टेलचे भूमिपूजनदेखील ऑनलाइन पद्धतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

गंगापूर रोड येथील नागरिकांच्या सर्वाधिक पसंतीचे प्रमोद महाजन गार्डन नवीन रूपात दिसणार आहे. प्रमोद महाजन गार्डनच्या नूतनीकरणाचेदेखील भूमिपूजन ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. संत गोरोबाकाका कुंभार यांच्या महाराष्ट्रातील एकमेव मंदिराचे व सभामंडपाचे भूमिपूजन या वेळी करण्यात येणार आहे.

याचबरोबर स्मार्टसिटी योजनेअंतर्गत जुने नाशिक येथे बांधलेल्या स्वर्गीय सुरेश मानकर जलकुंभ व हुतात्मा आनंद कान्हेरे मैदान येथे बांधण्यात आलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जलकुंभाचे लोकार्पण होणार आहे.

स्मार्ट स्कूलचेदेखील लोकार्पण करण्यात येणार आहे. विविध विकासकामांच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahabaleshwar News: 'महाबळेश्वरमध्ये मध्यरात्री टपरीवर कारवाई'; आचारसंहितेचा फायदा घेत व्यावसायिकाचा प्रताप; प्रशासनाने डाव हाणून पाडला

Beed Heavy Rain: आता तरी आम्हाला मदत मिळणार का? शेतकऱ्यांचा केंद्रीय पथकाला सवाल, येवलवाडी परिसरात केली पाहणी

Nashik Kumbh Mela : कुंभमेळा कामांना आचारसंहितेचा अडसर नाही! त्र्यंबकेश्वरमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण; आयुक्त शेखर सिंह यांची माहिती

Pune News: 'काचळवाडीला जेरबंद बिबट्याचा सुटकेसाठी दोन बिबट्यांकडून प्रयत्न'; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Girish Mahajan : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरण : "जागेचा मोबदला मिळेल," गिरीश महाजन यांचे आश्वासन; अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांकडे

SCROLL FOR NEXT