Devendra Fadanvis  esakal
नाशिक

Devendra Fadanvis Nashik Daura: फडणवीस यांच्या दौऱ्यामध्ये कपात

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्य पोलिस स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभासाठी येत असताना भाजपच्या शहरातील तीनही आमदारांनी उद्‍घाटनाची भली मोठी यादी सादर केली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्य पोलिस स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभासाठी येत असताना भाजपच्या शहरातील तीनही आमदारांनी उद्‍घाटनाची भली मोठी यादी सादर केली.

मात्र त्या यादीला कात्री लावत फडणवीस यांनी अवघे तीन कार्यक्रम निवडून मोजक्याच कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. (Devendra Fadnavis Nashik Daura tour cut short nashik news)

श्री. फडणवीस हे १० फेब्रुवारीला नाशिक शहरात येणार आहेत. सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागू शकते. त्यामुळे मंत्र्यांचे कार्यक्रमदेखील घाईगडबडीत आटोपले जात आहेत. श्री. फडणवीस यांचा दौरा निश्चित झाला आहे.

पोलिस अकादमीमध्ये सुरू असलेल्या पोलिसांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे. त्या जोडीला दिवसभर फडणवीसांच्या हस्ते उद्‍घाटनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

मात्र कार्यक्रमांना प्रदेश पातळीवरून मोठ्या प्रमाणात कात्री लावण्यात आल्याचे समजते. पोलिस अकादमीच्या कार्यक्रमांसोबत जल परिषद व सीबीएस मेळास्थानक येथील बस पोर्टचे उद्‍घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT