Tawalkhor sitting under Ahilya Devi Holkar Bridge esakal
नाशिक

Nashik News : टवाळखोरांमुळे भाविक असुरक्षित; अहिल्यादेवी होळकर पुलाखाली नशेखोरांचा धुडगूस

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : शहरात भाविक अन् पर्यटकांची कायम गर्दी असते. परंतु अहिल्यादेवी होळकर पुलाखाली चित्रकला महाविद्यालयाच्या पायरीवर मद्यपी अन् नशेखोरांचा धुडगूस सूरू आहे. पर्यटकांबरोबरच विद्यार्थी व स्थानिक नागरिकांना धमकावणे, त्यांची आर्थिक लूट करून मारहाण करण्याच्या घटनांमध्ये काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पोलिसांनी या टवाळखोर मद्यपीचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहेत. (Devotees unsafe due to criminals Ahilya Devi Holkar under bridge full of drunkards Nashik News)

गोदाघाट अन् परिसरात देश- विदेशातील भाविक अन् पर्यटकांची वर्षभर गर्दी असते. परंतु दिवाळी , उन्हाळी सुटी तसेच सण उत्सवांत गर्दीत अधिक भर पडते. परिसरात भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री एकमुखी दत्तमंदिर, सुंदरनारायण मंदिर असून मंदिरात भाविकांची कायम वर्दळ असते. परंतु गेल्या आठवड्यात सुंदरनारायण मंदिर खालील पायऱ्यांच्या परिसरात एका भाविकाला कोयत्याचा धाक दाखवून लूट करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

त्यांना मारहाणदेखील करण्यात आली. सुदैवाने टवाळखोरांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. यापूर्वीही एकाची हत्या आणि इतर मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. या ठिकाणचे अनेक तरुण रस्त्यावरच मद्यपान, गांजा, अफू व इतर नशा करताना दिसतात. अर्वाच्य भाषेत शिवीगाळदेखील करतात. त्यामुळे भर दुपारीदेखील या ठिकाणाहून जाण्यासाठी भाविक घाबरतात. परंतु बाहेर गावच्या भाविकांना माहीत नसल्यामुळे अनेकांची लूट होते. निष्पाप भाविकांना त्यांचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

हेही वाचा :मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

याबाबत पोलिसाकडून कुठलीही कार्यवाही होत नसल्याने भाविकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. एकमुखी दत्तमंदिरात दररोज तसेच गुरुवारी हजारो भाविक आरती, दर्शनासाठी येतात. परंतु सुंदरनारायण मंदिराकडून खाली येणाऱ्या पायऱ्या रस्त्यावरच आणि पुलाखालील धबधबा परिसरात मद्यपींनी आपले बस्तान मांडल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहेत. याबाबत परिसरातील रहिवाशांनी तक्रार करूनही कुठल्याही प्रकारची पोलिसांकडून कार्यवाही होत नाही. आता तरी पोलिस प्रशासनाला केव्हा जाग येईल असा सवाल भाविक आणि परिसरातील रहिवासी उपस्थित करत आहेत.

विद्यार्थ्यांनाही नाहक त्रास

परिसरात चित्रकला महाविद्यालय आहे. या ठिकाणी शेकडो विद्यार्थ्यांचा राबता असतो. परंतु पायरीवर बसून नशा करत विद्यार्थ्यांनादेखील दमबाजी देण्याचे प्रकार सुरू आहे. त्यामुळे हे क्षेत्र पोलिसांनी टवाळखोरी मुक्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT