नाशिक

महालक्ष्मी नगरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; सहा जणांना चावा

CD
फोटो : B04973 डीजीपीनगर : कैफियत मांडण्यासाठी अशोका मार्ग पोलिस चौकीत आलेले नागरिक. -- मोकाट कुत्र्यांचा सहा जणांना चावा त्रस्त नागरिकांची पोलिस चौकीत धाव सकाळ वृत्तसेवा डीजीपीनगर, ता. १२ : प्रभाग २३ मधील अशोका मार्गावरील श्री महालक्ष्मीनगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. दोन दिवसांत सहा जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्रस्त नागरिकांनी पोलिस चौकीत धाव घेत महापालिका प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. महालक्ष्मीनगर परिसरातील रस्ते आणि इमारतींच्या आसपास सात ते आठ मोकाट कुत्रे सतत फिरत असतात. रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जाणे, मागे लागणे आणि रात्रीच्या वेळी सतत भुंकणे,असे प्रकार वाढले आहेत. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडतानाही भीती वाटत आहे. एका लहान मुलाच्या पायाला कुत्र्याने चावा घेतल्याची घटनाही घडली आहे. परिसरात काही व्यक्ती रात्री-अपरात्री कुत्र्यांना मांस आणि अन्य खाद्यपदार्थ घालत असल्याने त्यांचा वावर वाढत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. यामुळे अन्नकचरा साचून सार्वजनिक स्वच्छतेचाही प्रश्न निर्माण होत आहे. यासंदर्भात रहिवाशांनी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे निवेदन देऊन तक्रार केली आहे. महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने दोन वेळा पाहणी करूनही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या समस्येकडे गांभीर्याने पाहून संबंधित विभागाला तातडीने कार्यवाहीचे निर्देश द्यावेत आणि केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल द्यावा,” अशी मागणी स्थानिक नागरिक मारुती धुमाळ यांनी केली. योगिता कांडेकर, पल्लवी भोळे, कल्याणी भडांगे, मनाली पहिलवान, जयश्री बिरांनी, शीतल झा, जयसिंह परदेशी, वैशाली पाटील, संध्या कातकाडे, रोशनी वाघ, विजया सोनवणे यांच्यासह परिसरातील रहिवाशांनी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus Fare Hike: बसमधून प्रवास करणे महागणार! प्रवासात खिसा रिकामा, मिरा-भाईंदर पालिकेचा बस भाडेवाढीचा प्रस्ताव

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

SCROLL FOR NEXT