पान दोन मेन
-------------
04980
डीजीपीनगर : जॉगिंग ट्रॅक जवळ जलवाहिनी फुटल्याने वाया जात असलेले पाणी.
डीजीपी नगरला वाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया
परिसराील पुरवठा ठप्प; सर्वत्र खोदकामामुळे नागरिक संतप्त; दुरुस्तीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
डीजीपी नगर, ता. १३ : प्रभाग क्रमांक २३ मधील डीजीपी नगर-१ येथील जॉगिंग ट्रॅकजवळ स्मार्टसिटीच्या सीसीटीव्ही केबल टाकण्याच्या कामादरम्यान गांधीनगर जलकुंभावरून येणाऱ्या चार आणि सहा इंची वाहिन्या फुटल्याची घटना घडली. यामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावरून वाहून वाया गेले. या निष्काळजीपणामुळे डीजीपी नगर-१, वाराही नगर, रविशंकर मार्ग, खोडेनगर, विधाते नगर, बँक कॉलनी, अरण्येश्वर महादेव मंदिर परिसर तसेच मनोज गॅरेजच्या मागील भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. नवरात्रोत्सवात पाणी न आल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
प्रभागात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून स्मार्ट सीटीअंतर्गत केबल टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना विश्वासात न घेता जेसीबीच्या साहाय्याने बेजबाबदारपणे खोदकाम केले जात आहे. यापूर्वी हगवणे नगर परिसरातही अशाच प्रकारे जलवाहिनी फुटल्याची घटना घडली होती. नियोजनाचा आणि समन्वयाचा प्रचंड अभाव असल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत असून रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
---------
अधिकाऱ्यांकडे तक्रार अन् प्रत्यक्ष पाहणी
जलवाहिनी फुटल्याचे लक्षात येताच स्थानिक नगरसेविका संध्या कुलकर्णी यांनी ही बाब स्मार्टसिटीचे सुमंत मोरे, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक रवींद्र धारणकर आणि कार्यकारी अभियंता विशाल गरुड यांच्या तातडीने निदर्शनास आणून दिली. त्यांच्या सूचनेनुसार अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
स्मार्टसिटीच्या कामात कुठल्याही प्रकारचा समन्वय नसल्याने जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. भूमिगत वाहिन्या शोधण्यासाठी रूट सेन्सरचा वापर केला जात नाही. ठेकेदार आणि सुपरवायझर यांच्यात ताळमेळ नसून कामाच्या बाबतीत कोणतेही गांभीर्य दाखवले जात नाही.
संध्या कुलकर्णी, नगरसेविका, प्रभाग २३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.