नाशिक

प्रभाग २३ दीपाली नगरमध्ये ८ महिन्यांपासून पाणी गळतीचा प्रश्न कायम

CD
फोटो : B05100 डीजीपीनगर : मेन व्हॉल्व्हमधून ठिकठिकाणी सुरू असलेली पाणीगळती. --- आठ महिन्यांपासून जलवाहिनीला गळती प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दीपालीनगरला पाण्याची नासाडी डीजीपीनगर, ता. १७ : प्रभाग २३ मधील दीपालीनगर परिसरात ७ ते ८ महिन्यांपासून सुरू असलेल्या जलवाहिनीच्या गळतीमुळे दररोज शेकडो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. या गंभीर समस्येबाबत संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार माहिती देऊन तसेच गळतीचे फोटो व व्हिडिओ पाठवूनही अद्याप कोणतीही ठोस दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या संदर्भात शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपमहानगरप्रमुख सरप्रीतसिंग बल यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. मात्र, संबंधित ठेकेदार काम करत नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. दुसरीकडे, स्थानिक नागरिकांनीही या समस्येबाबत अनेकदा तक्रारी केल्या असून स्थानिक नगरसेवकांच्याही निदर्शनास हा विषय आणून दिला आहे; परंतु त्यांच्याकडूनही अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. एकीकडे दुष्काळसदृश परिस्थितीत नागरिक पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी संघर्ष करत असताना, दुसरीकडे महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. ‘पाणी वाचवा’चे आवाहन करणाऱ्या प्रशासनाला प्रत्यक्षात सुरू असलेली ही पाण्याची नासाडी का दिसत नाही? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. प्रशासनाने तातडीने या जलवाहिनीची दुरुस्ती करून संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी; अन्यथा स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा उपमहानगरप्रमुख सरप्रीतसिंग बल यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : "तुम्ही खुर्चीवर बसण्याच्या लायकीचे नाही"; वकिलाचे CJI सूर्यकांत यांना भर कोर्टात खडे बोल, आता होणार फौजदारी कारवाई?

एमएस धोनी IPL मधून निवृत्त! CSK कडून मोठी घोषणा, आता दिसणार या भूमिकेत

Accident News: तिघांना उडवून कार खड्ड्यात कोसळली ;एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी ; खापरी शिवारातील घटना

Maharashtra: वारसा संवर्धनासोबत स्वच्छताही महत्त्वाची! संरक्षित स्मारकांजवळ शौचालयांना मुंबई उच्च न्यायालयाची मंजुरी

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरात वाढणार ‘अक्वान’ चक्रीवादळाची तीव्रता वाढणार; २० नोव्हेंबरला आंध्र प्रदेश किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT