नाशिक

धनगर समाजाचा महामेळावा

CD
धुळे टुडे २ साठी... --- फोटो- NSK26H32077 धुळे ः धनगर समाजाच्या महामेळाव्याच्या तयारीच्या अनुषंगाने जिल्हा कारागृहासमोरील रस्त्यावर पाहणी करताना दीपक बोराडे, अप्पा खताळ, अमोल मासुळे, मनोज गर्दे आदी. --- धनगर समाजाचा धुळ्यात आक्रोश मोर्च्यासह महामेळावा १५ ऑक्टोबरला आयोजन; दीपक बोराडे यांची उपस्थिती सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १२ ः अनुसूचित जमातीतील (एसटी) आरक्षणासाठी दीपक बोराडे यांच्या नेतृत्वात १५ ऑक्टोबरला धुळ्यात उत्तर महाराष्ट्रातील धनगर समाजाचा महामेळावा आणि आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत धनगर समाजाचा आक्रोश पोहोचविण्याचा आंदोलनाचा उद्देश आहे. महामोर्चा व महामेळाव्याच्या तयारीसाठी श्री. बोराडे सोमवारी धुळ्यात दाखल झाले. क्यूमाईन क्लबसमोरील नियोजित मैदानाची त्यांनी पाहणी केली. या वेळी धनगर समाजाचे नेते अप्पा खताळ, नगरसेवक अमोल मासुळे, धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे उपस्थित होते. धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधून सुमारे एक लाख समाजबांधव या मेळाव्यात सहभागी होतील, असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला. उत्तर महाराष्ट्रातील बांधवांनी ‘अभी नही तो कभी नही’ ही भूमिका घेत या न्याय हक्काच्या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. बोराडे यांनी केले. सरकारकडून चालढकल केंद्राच्या अनुसूचीमध्ये ‘धनगड’ प्रवर्गाला एसटी आरक्षण असून, धनगर आणि धनगड एकच असल्याचा युक्तिवाद करत राज्यातील धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी दीर्घकाळापासून प्रलंबित आहे. सत्तेत येण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांनी धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्याचे वचन दिले होते. मात्र, बारा वर्षे उलटूनही सरकारकडून केवळ चालढकल सुरू असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. संपर्क कार्यालयाचे उद्‍घाटन महामेळावा पूर्णपणे अराजकीय असून, व्यासपीठावर केवळ श्री. बोराडे हेच उपस्थित राहून समाजबांधवांना मार्गदर्शन करणार आहेत. बोराडे यांनी मेळाव्याच्या अनुषंगाने तयारीचा आढावा घेतला. दरम्यान, सोमवारी (ता. १२) दुपारी तीनला बर्वे स्मृती येथे समाजबांधवांच्या उपस्थितीत संपर्क कार्यालयाचे उद्‍घाटन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vertical Property Card : महाराष्ट्रातील प्रत्येक सदनिकेला स्वतंत्र ओळख क्रमांक आणि मालकी हक्कांची सरकारी नोंद मिळणार; महसूल विभागाकडून व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्डचा मसुदा खुला

Hinjewadi Metro : हिंजवडी-वाकडमधील मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी पीएमआरडीएचा निर्णय; २६ जोडरस्त्यांचा विकास, डिसेंबरअखेर प्रत्यक्ष कामांना सुरुवात

High Court Gift Deed Ruling : "२० वर्षांपूर्वी सुनेला बक्षीसपत्राने दिलेली मालमत्ता सासूला परत मागता येणार नाही!" उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

Jalgaon Jalna Railway Line Tunnel : मराठवाडा-खानदेशचा प्रवास सुसाट होणार! जळगाव-जालना रेल्वे मार्गावर बनणार देशातील सर्वात मोठा २३.५ किमीचा बोगदा; ३३६ किमीचे अंतर येणार थेट निम्म्यावर!

Pune News : स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाला ‘डीआयएटी’चे बळ; अत्याधुनिक लेझर आणि फोटॉनिक्स प्रणाली विकसित करणार

SCROLL FOR NEXT