फ्लायर
NSK26H34649
जळगाव : आरोग्य भारतीतर्फे धन्वंतरी पूजन करताना मान्यवर.
---
धनत्रयोदशीला बाजारपेठेत उत्साह; सोने-चांदीसह वाहन खरेदीला पसंती
मुहूर्तावर खरेदीसाठी नागरिकांची गर्दी; पूजासाहित्य, भांडी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंनाही मागणी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ६ : दिवाळी सणाचा महत्त्वाचा दिवस मानली जाणारी धनत्रयोदशी (धनतेरस) शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने नागरिकांनी सोने-चांदीचे दागिने, नाणी, चांदीच्या वस्तू, नवीन भांडी तसेच वाहने खरेदी करण्याला पसंती दिली. शुभमुहूर्तावर खरेदी करण्यासाठी सराफ बाजार, भांड्यांची दुकाने आणि वाहनांच्या शोरूममध्ये ग्राहकांची वर्दळ दिसून आली. घरोघरी धन्वंतरी पूजन, लक्ष्मी-कुबेर पूजन आणि दीपप्रज्वलन करून धनत्रयोदशीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.
हिंदू संस्कृतीत धनत्रयोदशीला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. समुद्रमंथनातून भगवान धन्वंतरी अमृतकलशासह प्रकट झाल्याची आख्यायिका या दिवसाशी जोडली जाते. त्यामुळे या दिवशी धन्वंतरीची पूजा करून उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते. तसेच लक्ष्मी आणि कुबेराची पूजा करून घरात सुख, समृद्धी आणि भरभराट नांदावी, अशी कामना केली जाते. गेल्या काही दिवसांपासून दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग सुरू होती. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर खरेदीला विशेष महत्त्व असल्याने अनेकांनी या दिवसासाठी खरेदीचे नियोजन केले होते.
चौकटीत
आरोग्य भारतीतर्फे धन्वंतरी पूजन
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर आज ‘चेतना’ संघ कार्यालय, बळीराम पेठ येथे आरोग्य भारती जळगावतर्फे धन्वंतरी पूजनाचा कार्यक्रम झाला. आरोग्य भारती सदस्यांसाठी अनेस्थेसियोलॉजिस्ट सोसायटी (जेएएस)तर्फे आयएसए पंचरक्षक प्रणालीचे विशेष प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी जेएएसचे सचिव डॉ. जयश्री राणे व जीसी सदस्य व आरोग्य भारती प्रांत उपाध्यक्ष डॉ. लीना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात आले. आरोग्य भारतीच्या सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रशिक्षणात सक्रिय सहभाग घेतला. आयएससीसीएम’चे सचिव डॉ चेतन चौधरी यांनी कोड लाइफ बद्दल माहिती दिली. यावेळी आरोग्य भारतीचे अध्यक्ष डाॅ सुनील सूर्यवंशी, डाॅ. नितीन धांडे उपस्थित होते. उपक्रमामध्ये आरोग्य भारतीचे डॉ. पुष्कर महाजन, सचिव भूषण क्षत्रिय, सहसचिव तुषार चौधरी, डॉ. निष्ठा लोटवाला, महेश जैन व आरोग्य भारतीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.